बॉलिवूडचे सुपर व्हिलन 'गब्बर' यांची मुलगी आहे कमालीची सुंदर, ती काय करते वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 03:35 PM2022-02-22T15:35:04+5:302022-02-22T15:41:52+5:30

Amjad Khan Daughter : आज आम्ही तुम्हाला अमजद खान नाही तर त्यांच्या मुलीबाबत सांगणार आहोत. जिच्याबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. इतक्या मोठ्या स्टारची मुलगी असूनही ती लाइमलाईटपासून दूर राहते.

बॉलिवूडमधील गाजलेल्या व्हिलन्सचा जेव्हाही विषय निघेल तेव्हा 'शोले' गब्बर सिंहची चर्चा होणार नाही असं होऊ शकत नाही. अमजद खान (Amjad Khan) यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सिनेमे दिले आणि एकापेक्षा एक भूमिका साकरल्या. मात्र, आता ते या जगात नाहीत. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबाबत नाही तर त्यांच्या मुलीबाबत सांगणार आहोत. जिच्याबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. इतक्या मोठ्या स्टारची मुलगी असूनही ती लाइमलाईटपासून दूर राहते.

बॉलिवूडमधील स्टार्स किड्स नेहमीच चर्चेत असतात. हिंदी सिनेमातील 'गब्बर' बाबत तर सर्वांनाच माहीत आहे. आपला अभिनय आणि डायलॉगसाठी ते जगभरातील आपल्या फॅन्सच्या मनात घर करून आहेत. त्यांनी इतकं यश मिळवलं की, त्यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही.

अमजद खान यांना सीमाब खान आणि शादाब खान अशी दोन मुलं आणि अहलम खान ही एक मुलगी आहे. अहलम खान (Ahlam Khan) कधी फार लाइमलाईटमध्ये आली नाही. अहलम फार सुंदर तर आहेच सोबतच ती उत्तम अभिनेत्री देखील आहे.

अहलम खान सुंदर आहे. इतकंच नाही तर ती वडिलांप्रमाणे कमाल कलाकार आहे. अहलम हे थिएटर विश्वातील एक मोठं नाव आहे. २००५ मध्ये 'रिफ्लेक्शन' नावाच्या एका सिनेमातही ती दिसली होती.

'रिफ्लेक्शन' मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची शॉर्टफिल्म होती. त्यानंतर अहलमने मकरंद देशपांडेसोबत एका सिनेमात काम केलं होतं.

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स किड्स आहेत जे नेहमीच चर्चेत असतात. पण अहलम खान झगमगाटापासून दूर राहते. २०११ मध्ये तिने थिएटर आर्टिस्ट आणि अनेक मालिकांमध्ये दिसलेला जफर कराचीवाला याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक ७ वर्षांचा मुलगा मिहैल आहे.

अहलम सध्या थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. गेली अनेक वर्ष ती यातच रमते. ती सोशल मीडियापासूनही दूर राहते. मात्र, तरीही तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट आहेत. पण हे दोन्ही अकाऊंट प्रायव्हेट आहेत.