Cannes 2023: अनुष्का शर्मा ते सारा अली खान; बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री अवतरणार 'कान्स'च्या रेड कार्पेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:56 PM2023-05-17T15:56:02+5:302023-05-17T16:00:44+5:30

कान्स २०२३ हा १६ मे ते २७ मे दरम्यान कान्स येथे होणार आहे. अनुष्का शर्मापासून ते सारा अली खान या वर्षीच्या यादीत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री आहेत.

बहुप्रतिक्षित कान्स २०२३ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे आणि चाहत्यांनी आधीच त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे कान्सचे अपडेट पाहण्यासाठी सुरूवात केली आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या फॅशन सोबत कान्सचा रेड कार्पेट या अभिनेत्री अनुभवणार आहेत.

कान्स २०२३ हा १६ मे ते २७ मे दरम्यान कान्स येथे होणार आहे. अनुष्का शर्मापासून ते सारा अली खान या वर्षीच्या यादीत जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिनेत्री आहेत.

अदिती राव हैदरी हिने २०२२ मध्ये कान्समध्ये पदार्पण केले होते आणि तिच्या ग्लॅमरस लूकची चर्चा तेव्हा झाली होती. यंदा अदिती कान्ससाठी काय वेगळं करणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. २०२३च्या कान्स लूकसाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा यावर्षी पदार्पण करताना दिसणार आहे आणि सोशल मीडियावर नेटिझन्समध्ये अनुष्कासाठी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. रिपोर्ट्सनुसार, ती या खास इव्हेंटचा भाग असणार असून सिनेमातील उत्कृष्ट महिलांचा सन्मान करणार आहे. अनुष्का हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेटसोबत स्टेज शेअर करणार असल्याचे बोलले जाते आहे.

प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये मध्यरात्रीच्या स्क्रिनिंगसाठी सनी लिओनीच्या आगामी मर्डर केमस्ट्री केनेडीची निवड करण्यात आली आहे. स्क्रिनिंगपूर्वी, अभिनेत्रीने चित्रपटाचा टीझर आला असून या चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे.

सारा अली खान देखील तिच्या भव्य कान्स २०२३ मध्ये पदार्पण करणार आहे. ही अभिनेत्री ऑन-स्क्रीन काही उल्लेखनीय परफॉर्मन्स देत असताना ती इकडे देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

अक्षय कुमारसोबत अलीकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी माजी मिस इंडिया मानुषी छिल्लर या वर्षी सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री डॉली सिंगसोबत कान्समध्ये पदार्पण करणार आहे.