मिस युनिव्हर्स ठरलेल्या लारा दत्तामध्ये झालाय कमालीचा बदल; विदाऊट मेकअप आता ओळखणंही आहे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 01:00 PM2022-08-28T13:00:46+5:302022-08-28T13:04:00+5:30

Lara dutta: एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या लाराचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे.

२००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता.

मॉडलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी लारा आज बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या लाराचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे.

बऱ्याचदा लारा तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच लाराने इन्स्टाग्रामवर तिचा नो मेकअप लूक असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमघ्ये तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

लाराचा हा फोटो वर्कआऊट केल्यानंतरचा आहे. त्यामुळे या फोटोमध्ये ती घामाने चिंब भिजलेली दिसत आहे.

२०२० मध्ये लाराने हंड्रेड या सीरिजमधून ओटीटवर पदार्पण केलं.