लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्या होत्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री; नावं ऐकून व्हाल आश्चर्यचकित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:51 PM2022-03-16T13:51:59+5:302022-03-16T13:59:03+5:30

Bollywood actress: बॉलिवूडमध्ये अशा काही लोकप्रिय अभिनेत्री आहेत ज्या लग्नापूर्वीच गरोदर होत्या.

श्रीदेवी - बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन होऊन बराच काळ झाला. मात्र,तरीदेखील त्यांच्या प्रत्येक गोष्टीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. सध्या तिच्या प्रेग्नंसीविषयी चर्चा होत आहे. श्रीदेवी लग्नापूर्वीच प्रेग्नंट होत्या असं म्हटलं जातं.

श्रीदेवी यांनी चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं. परंतु, लग्नापूर्वीच त्या प्रेग्नंट राहिल्या होत्या. विशेष म्हणजे श्रीदेवी प्रेग्नंट असताना बोनी कपूर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा घटस्फोटही झालेला नव्हता. परंतु, १९९६ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली व काही महिन्यातच त्यांच्या लेकीचा जन्म झाला.

सारिका हासन - लोकप्रिय अभिनेत्री सारिका हासनदेखील लग्नापूर्वीच गरोदर होत्या. त्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्याशी लग्न केलं होतं.

सारिका हासन लग्नापूर्वी गरोदर होत्या. त्यामुळे लग्नानंतर काही महिन्यातच त्यांनी अनुष्काला जन्म दिला. त्याकाळी त्यांची बरीच चर्चा रंगली होती.

महिमा चौधरी - परदेस या चित्रपटातून खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. त्याकाळी महिमाच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. अगदी तिच्या प्रियकरापासून ते ब्रेकअपपर्यंत.

महिमादेखील लग्नापूर्वी प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं. २००६ मध्ये तिने गुपचूपपणे लग्न केलं आणि लग्नाच्या काही महिन्यातच तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला.

कोंकणा सेन शर्मा - रोकठोक बोलण्याची पद्धत आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मादेखील लग्नापूर्वी प्रेग्नंट होती.

कोंकणाने १५ मार्च २०११ मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या सहा महिन्यांमध्येच तिने तिच्या मुलाला जन्म दिला.

सेलिना जेटली - अभिनेत्री सेलिना जेटलीदेखील लग्नापूर्वी प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जातं. मात्र, सेलिनने हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

लग्नापूर्वी मी प्रेग्नंट नव्हते. या अफवा आहेत, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.