पणवती आहेस म्हणत विद्या बालनला 12 सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता; आज तिच आहे 204 कोटींची मालकीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 05:49 PM2024-01-02T17:49:51+5:302024-01-02T17:55:33+5:30

Vidya balan: विशेष म्हणजे अनेक टोमणे, खोचक बोलणं, सततचं रिजेक्शन हे सगळं सहन केल्यानंतरही विद्याने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.

झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर विद्याने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.

आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्या बालनचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मात्र,तिचा हा प्रवास सोपा नव्हता. तिच्या दिसण्यावरुन, वजनावरुन अनेकांनी तिला सुरुवातीच्या काळात ट्रोल केलं.

सुरुवातीच्या काळात विद्याला इंडस्ट्रीत फार मोठा स्ट्रगल करावा लागला. तिला जवळपास १३ सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. इतकंच नाही तर तिला अपशकुनी म्हणून हिनवण्यातही आलं होतं.

'भलो थेको' या बंगाली चित्रपटातून विद्याने कलाविश्वात पदार्पण केलं. बंगाली सिनेमातील तिची ही भूमिका गाजल्यानंतर तिने परिणिता या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

विद्याला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. एकदा तिने तेजाब सिनेमातल्या माधुरी दिक्षितच्या एक दो तीन या गाण्यावर डान्स केला. तेव्हापासून इंडस्ट्रीत येण्याचं स्वप्न ती पाहु लागली.

काही वर्षांपूर्वी विद्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने कलाविश्वातील तिच्या प्रवासाविषयी भाष्य केलं. तिला निर्माते, दिग्दर्शकांनी कशा प्रकारे हिनवलं, सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला हे तिने सांगितलं.

"एका निर्मात्याने मला खूप वाईट वागणूक दिली. त्यामुळे मी इतकी दुखावले गेली की जवळपास सहा महिने आरशात स्वतःकडे पाहण्याचे धाडस करू शकले नाही",असं विद्या म्हणाली.

काही कारणास्तव एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचे चक्क १२ चित्रपट फ्लॉप ठरले. पण या सगळ्याचं खापर त्याने विद्यावर फोडलं. विद्याला दोषी ठरवत तिला त्याने पनौती म्हणून हिनवलं.

विशेष म्हणजे अनेक टोमणे, खोचक बोलणं, सततचं रिजेक्शन हे सगळं सहन केल्यानंतरही विद्याने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं.

आज आपल्या मेहनतीच्या जोरावर विद्या बालन कोट्यवधींची मालकीन आहे. रिपोर्टनुसार, विद्या बालन आज 204 कोटींची मालकीन आहे.