ऑलिम्पिक विजेत्या परदेशी खेळाडूला डेट करतेय 'ही' अभिनेत्री, ना लग्न ना ब्रेकअप; अशी आहे स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:52 PM2024-01-19T13:52:58+5:302024-01-19T14:01:18+5:30

गेल्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे शाहरुखची ही अभिनेत्री, ७ वर्ष मोठ्या परदेशी बॅडमिंटनपटूला करतेय डेट

मनोरंजनसृष्टीत आजकाल लग्न, घटस्फोट, ब्रेकअप या अगदीच सामान्य गोष्टी झाल्या आहेत. अनेकांचा १०-२० वर्षांचा संसार मोडत आहे तर काही जोड्या २०-२५ वर्षांपासून एकत्र आहेत.

लग्न न करता सोबत राहणं म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणं हे सुद्धा अगदीच कॉमन झाले आहे. बॉलिवूडमध्ये अशीच एक अभिनेत्री आहे जी बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे मात्र तिने अद्याप लग्न केलेले नाही. नुकतंच तिने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

ही अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू (Taapsee Pannu). महिला प्रधान चित्रपट करणारी तापसी पन्नू सध्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. एकीकडे प्रोफेशनली यश मिळत असतानाच ती वैयक्तिक आयुष्यातही खूप खूश असल्याचं तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

याचा अर्थ तापसी लग्न करणार आहे का? तर नाही. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली,'मी गेल्या १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि खूपच आनंदात आहे. जेव्हा मी बॉलिवूडमध्ये डेब्यू करत होते तेव्हाच माझी भेट मथियसशी झाली. तेव्हापासून आम्ही दोघं सोबत आहोत.'

ती पुढे म्हणाली,'मी ना आता त्याला सोडण्याच्या विचारात आहे ना दुसऱ्या कोणालाही डेट करण्याचा माझा विचार आहे. कारण मी माझ्या रिलेशनशिपमध्ये जरा जास्तच खूश आहे.'

तापसी बॅडमिंटनपटू मॅथियस बोएला डेट करत आहे. 43 वर्षीय मॅथियस डेन्मार्कचा आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ऑलंपिक मेडलही पटकावले आहे. तापसी आणि मॅथियसमध्ये ७ वर्षांचं अंतर आहे.

1 ऑगस्ट रोजी तापसीच्या वाढदिवशी मॅथियसने दोघांचा क्युट फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. तापसी आणि मॅथियस अनेकदा एकमेकांसोबत फिरायला जातात आणि सुट्ट्यांचा आनंद घेतात. त्यांचे फोटो याआधी व्हायरल झाले आहेत.

तापसीला लग्नाबद्दल विचारलं असता तिचा आताच लग्न करण्याचा प्लॅन नसल्याचं ती म्हणाली. तापसी सध्या आपल्या करिअरकडे लक्ष देत आहे. नुकताच तिचा 'डंकी' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये ती शाहरुख खानसोबत झळकली. शिवाय तापसीचा 'हसीन दिलरुबा 2' चित्रपट भेटीला येणार आहे.