साधं सिंपल सौंदर्य तुझं; मृणाल ठाकूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:39 PM2024-01-21T19:39:19+5:302024-01-21T19:53:54+5:30

पेस्टल फ्लोरल ड्रेसमधील मृणालच्या लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या

गुणी अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूरने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.

तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीची फॅन फॉलोविंगही खूप मोठी आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी मृणाल आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते.

अनेक चित्रपटांच्या माध्यमातून मृणालने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

आता मृणालने हे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअऱ केले आहेत. या फोटोमध्ये मृणाल अतिशय सुंदर आणि सोज्वळ दिसतेय.

फ्लोरल प्रिंट आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या लुकवर चाहत्यांची तर विकेटच पडली आहे.

मृणालने सुंदर नाजूक झुमके कॅरी केले होते. गोल्डन रंगाच्या झुमक्याने तिचा लुक खूपच सुंदर दिसत होता.

'Filmy nahi फूल-my mood' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सिंपल मेकअपमध्येही ती अगदी उठून दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

मृणालचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांच्या मनात घर करतो.