"मला आनंदी करायचं असेल तर..."; बॉलिवूड अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट व्हायरल, पोस्टही चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:49 IST2026-04-29T15:32:03+5:302026-04-29T15:49:35+5:30

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी समुद्रकिनारी जाऊन बोल्ड फोटोशूट करुन सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जी समुद्रकिनारी जाऊन बोल्ड फोटोशूट करुन सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे फातिमा सना शेख. फातिमाने लाल रंगाच्या बिकिनीत समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.

फातिमा सना शेखने शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुट्टीसाठी वेळ काढला. फातिमाने तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत हे खास क्षण एन्जॉय केले आहेत.

फातिमा सना शेखने दंगल सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या सिनेमासाठी फातिमाने तिच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली होती.

दंगलनंतर फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये विविध प्रकारच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. लव्हस्टोरी, अॅक्शन अशा विविध प्रकारच्या सिनेमात फातिमा झळकली.

फातिमा सना शेख रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. ती विविध पार्टी, इव्हेंटमध्ये हजेरी लावताना दिसते. फातिमाचं नाव आजवर अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं परंतु फातिमाने रिलेशनशिपचा कधीच जाहीर खुलासा केला नाही.

''मला आनंदी करायचं असेल तर मला डोंगरावर किंवा समुद्रकिनारी फिरायला घेऊन जा. अजून काही नको. याशिवाय बिजलीपेक्षा उत्तर ट्रॅव्हल पार्टनर असूच शकत नाही'', अशा शब्दांत फातिमाने पोस्ट लिहून तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत