'भूत बंगला'साठी अक्षय कुमारने घेतले 'इतके' पैसे; परेश रावल, राजपाल यादवचं मानधन किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:01 IST2026-04-18T12:13:55+5:302026-04-18T13:01:16+5:30

अक्षय कुमार, परेश रावल ते राजपाल यादव, भूत बंगलासाठी 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वाधिक मानधन

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारच्या भूत बंगला सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत प्रचंड चर्चा होती. अखेर काल १७ एप्रिल २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'भूत बंगला' या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही गाजलेली जोडी जवळपास १६ वर्षांनंतर एकत्र आली आहे. याआधी दोघांनी हेराफेरी, भुलभुलैया, गरम मसाला, भागम भाग, दे दना दन यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

या चित्रपटात अक्षय कुमारसह परेश रावल, राजपाल यादव, तब्बू, वामिका गब्बी, या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दरम्यान,'भूत बंगला' या चित्रपटाप्रमाणे त्यातील कलाकारांच्या मानधनाबद्दल देखील आता चर्चा रंगली आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटातील भूमिकांसाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं,याबद्दल जाणून घेऊया...

कोइमोईच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने चित्रपटासाठी त्याच्या मानधनापैकी २८.५ टक्के कमी फी घेतल्याचं बोललं जातंय.त्याने 'भूत बंगला'साठी ५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.असं असूनही तो चित्रपटातील सर्वांत महागडा कलाकार ठरला आहे.

अभिनेत्री वामिका गब्बी या सिनेमात अक्षय कुमारसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसत आहे.गेल्या काही वर्षांत वामिकाच्या मानधनात बरीच वाढ झाली आहे. अनेक दिग्दर्शकांची ती पहिली पसंत ठरत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, वामिका गब्बी सिनेमासाठी ३ कोटी रुपये फी घेतली आहे.

'भूत बंगला' या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक कलाकार पुन्हा पडद्यावर एकत्र पाहायला मिळत आहेत. अक्षय कुमार-प्रियदर्शन आणि अक्षय कुमार-परेश रावल यांच्या जोड्यांव्यतिरिक्त, अक्षय कुमार आणि तब्बू देखील बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. तब्बूने या सिनेमासाठी २.५ कोटी फी आकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडीसाठी २ कोटी रुपये मानधन घेतलंय.

राजपाल यादव हा या चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता आहे. अभिनेता राजपाल यादवला या चित्रपटासाठी दीड कोटी रुपये मानधन मिळालं आहे.