सिनेइंडस्ट्रीपासून कोसोदूर आहे कटप्पाची लेक?, तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 03:24 PM2022-08-12T15:24:33+5:302022-08-12T15:29:46+5:30

Bahubali: 'बाहुबली' चित्रपटात कटप्पाची भूमिका निभावून सत्यराज यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. त्यांची मुलगी कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात कार्यरत आहे.

भारतातील आतापर्यंतचा सर्वात सुपरहिट चित्रपट बाहुबली लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची मुख्य भूमिका असलेल्या प्रभासने या चित्रपटाद्वारे स्वत:च्या चाहत्यांची संख्या आणखी वाढवली. त्याचवेळी या चित्रपटात एक अशी व्यक्तिरेखा होती ज्याचे नाव नेहमीच चर्चेत होते, कटप्पा.

कटप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्य प्रकाश याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र त्यांना विशेष प्रसिद्धी फक्त बाहुबली मधूनच मिळाली. या लेखात आम्ही तुम्हाला कटप्पाचे कुटुंब आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगणार आहोत.

अभिनेता सत्यराज यांनी आपल्या अभिनय कौशल्याने आपला ठसा उमटवला आहे. तर त्यांच्या मुलीने सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहून सामाजिक कार्य करून सर्वांची प्रशंसा मिळवली आहे.

अभिनेता सत्यराज यांच्या मुलीचे नाव दिव्या सत्यराज आहे.

दिव्या सत्यराज तिच्या वडिलांप्रमाणे चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी सौंदर्यात ती अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

दिव्या सत्यराजने अभिनयाऐवजी आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. ती प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट आहेत.

दिव्या सत्यराज नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तसेच समाजकल्याणाच्या कामातही ती खूप सक्रिय आहे.

दिव्या सत्यराज गरीब आणि गरजूंनाही मदत करत असते. सत्यराज यांची मुलगी देशाबरोबरच परदेशातही तिच्या सामाजिक कार्यासाठी लोकप्रिय आहे.

दिव्या सत्यराजने आरोग्य जनजागृतीसाठी अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. दिव्या सत्यराज एक एनजीओही चालवतात. ज्याद्वारे ती लोकांना मदत करत असते.

एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींनी दिव्या सत्यराज यांचे सामाजिक कल्याणासाठी काम केल्याबद्दल पत्र लिहून कौतुकही केले आहे.

दिव्या सत्यराज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिला हजारो लोक फॉलो करतात.