कॉमेडीनंतर अ‍ॅक्शन करताना दिसणार आयुष्मान खुराना, 'एन अ‍ॅक्शन हिरो'चा फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:41 PM2022-11-10T15:41:13+5:302022-11-10T16:10:22+5:30

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाच्या 'एन अ‍ॅक्शन हिरो'चा फर्स्ट लूक आऊट झाला आहे,

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने त्याच्या 'एन अ‍ॅक्शन हिरो' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे ज्यामध्ये तो खूपच डॅशिंग अंदाजात दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कॉमेडीनंतर आयुष्मान खुराना आता अ‍ॅक्शन अवतारात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आयुष्मान खुराना बंदूक घेऊन पोझ देताना दिसत आहे. तसेच अभिनेत्याच्या चेहऱ्यावर काही दुखापतीच्या खुणाही दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

दुसऱ्या पोस्टरमध्ये आयुष्मान खुराना अभिनेता जयदीप अहलावतसोबत फायटिंग पोझमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आयुष्मान खुरानाच्या 'एन अ‍ॅक्शन हिरो' चित्रपटाचा ट्रेलर 11 नोव्हेंबरला रिलीज होणार असून हा चित्रपट 2 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, यलो प्रोडक्शन आणि टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिरुद्ध अय्यर करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)