Photos: बोल्डनेसमुळे sooryavanshiफेम निहारिका रायजादा चर्चेत; बॉलिवूड अभिनेत्रींवरही पडतीये भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:27 AM2021-11-03T10:27:04+5:302021-11-03T10:36:57+5:30

Niharica raizada: या चित्रपटात झळकणारे कतरिना कैफ, अजय देवगण वा अन्य कलाकार साऱ्यांनाच ठावूक आहेत. परंतु, ही नवीन अभिनेत्री निहारिका रायजादा कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे तिचे काही ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित राहिलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण, कतरिना कैफ, अक्षय कुमार, रणवीर सिंग अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर 'सूर्यवंशी' आणि त्यातील कलाकारांची चर्चा आहे. यामध्येच अभिनेत्री निहारिका रायजादादेखील चर्चेत येत आहे.

या चित्रपटात झळकणारे कतरिना कैफ, अजय देवगण वा अन्य कलाकार साऱ्यांनाच ठावूक आहेत. परंतु, ही नवीन अभिनेत्री निहारिका रायजादा कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे तिचे काही ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून निहारिका राजयादा ही अभिनेत्री कोण? यापूर्वी ती कोणत्या चित्रपटांमध्ये झळकली आहे?असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असून सोशल मीडियावर तिचं नाव सातत्याने सर्च केलं जात आहे.

निहारिका रायजादा ही प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ओपी नायर यांची नात आहे. निहारिका रिअल लाइफमध्ये प्रचंड ग्लॅमरस असून तिच्या याच अंदाजामुळे ती चर्चेत असते.

'सूर्यवंशी' या चित्रपटात निहारिका, अक्षय कुमारसह अँटी टेररिस्ट फिमेल स्क्वॉड ऑफिसर ही भूमिका साकारत आहे. परंतु, या भूमिकेतील तिचा अंदाजही चर्चेत येत आहे.

निहारिकाचं बालपण युरोपमध्ये गेलं असून ती येथेच लहानाची मोठी झाली आहे. Luxembourg येथे तिचं शिक्षण पूर्ण झालं असून तिने अमेरिकेतील एका संस्थेमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्यानंतर ती मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होती.

२०१३ साली निहारिकाने तिच्या करिअरची सुरुवात केली. 'सूर्यवंशी'पूर्वी ती 'डामाडोल' या बंगाली चित्रपटात झळकली होती. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांवर जादू करण्यास अपयशी ठरला.

बंगाली चित्रपटानंतर निहारिका बॉलिवूडमधील काही प्रोजेक्ट्समध्ये झळकली होती. निहारिका २०१० साली 'मिस इंडिया यूके' आणि 'मिस इंडिया वर्ल्डवाइड' या स्पर्धांमध्ये रनरअप ठरली आहे.

'सूर्यवंशी'पूर्वी तिने 'मसान', 'टोटल धमाल' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, या चित्रपटांमुळेदेखील ती फारशी प्रकाशझोतात आली नाही. मात्र, 'सूर्यवंशी'मुळे ती सध्या चांगलीच चर्चेत येत आहे.

'सूर्यवंशी'मध्ये काम करण्यापूर्वी निहारिकाला ३ महिने ट्रेनिंग घ्यावं लागलं होतं. भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने प्रचंड मेहनत केल्याचं सांगण्यात येतं.

निहारिका सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. इतकंच नाही तर तिने टॉपलेस फोटोशूट केल्याचंही पाहायला मिळतं. ( फोटो सौजन्य: निहारिका रायजादा फेसबुक पेज)