'विवाह'फेम अमृता रावच्या लग्नाचा अल्बम आला समोर; प्रसिद्ध आरजेसोबत अभिनेत्रीने बांधलीये लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 03:56 PM2022-04-06T15:56:12+5:302022-04-06T16:01:55+5:30

Amrita rao:गेल्या काही काळामध्ये पूनमचा म्हणजेच अमृता रावचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. त्यामुळे ही अभिनेत्री सध्या काय करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो.

अभिनेता शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला विवाह हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला होता.

उत्तम कथानक आणि कलाकारांच्या सुंदर अभिनय यामुळे हा चित्रपट विशेष गाजला.

या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री अमृता रावने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिने साकारलेल्या साधाभोळ्या पूनमची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

गेल्या काही काळामध्ये पूनमचा म्हणजेच अमृता रावचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. त्यामुळे ही अभिनेत्री सध्या काय करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो.

अलिकडेच अमृताने तिच्या लग्नातील अल्बमचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अमृताने प्रसिद्ध आरजे अनमोल याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

अमृता आणि अनमोल यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केलं होतं. ट्रेंडिंग यूट्यूब मालिका 'कपल ऑफ थिंग्ज' मध्ये या जोडीने २०१४ मध्येच लग्न केल्याचं सांगितलं. मात्र, २०१६ मध्ये लग्नाची घोषणा केली.

जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आमि २०१६ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.