Avneet Kaur : अवनीत कौरने शेअर केले खास फोटो, दिसतेय कहर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:00 PM2024-06-12T16:00:43+5:302024-06-12T16:10:51+5:30

अभिनेत्री अवनीत कौर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अवनीत कायम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

आता पुन्हा एकदा अवनीत कौरने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये अवनीत सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लूक कान्स फेस्टिवलमधील आहे.

'कान फिल्म फेस्टिव्हल २०२४' मध्ये तिनं हजेरी लावली होती. या फेस्टिवलमधील विविध लूक ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.

तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.

मेकअप आणि त्याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

अवनीत लवकरच 'लव्ह इन व्हिएतनाम'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यासोबतच तिचा अभिनेता सनी सिंगबरोबर 'लव की अरेंज मॅरेज' हा सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे.

अवनीत ही 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय 'मर्दानी', दोस्त', 'मर्दानी २' या सिनेमांमध्येही काम केलं आहे.