Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:29 PM2024-06-12T12:29:47+5:302024-06-12T12:46:54+5:30

Sargun Mehta : सरगुनला कॉलेजमध्ये असताना डेटिंग, प्लेजर आणि सेक्स नॉलेज याबाबत अजिबात समज नव्हती.

सरगुन मेहता पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठी स्टार आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्माती देखील आहे. तिने पती रवी दुबेसोबत अनेक शो केले आहेत.

उडारियां, स्वर्ण घर, जुनूनियत, दालचीनी, बादल पे पांव है यांचा समावेश आहे. या सर्व शोला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.

अभिनेत्री नेहमीच आपलं मत उघडपणे मांडत असते. मग ते मत प्रोफेशनल लाईफबाबत असो की पर्सनल आयुष्याबाबत.

सरगुनने Hauterrfly शी केलेल्या संवादात सांगितले होतं की, तिला कॉलेजमध्ये असताना तिला डेटिंग, प्लेजर आणि सेक्स नॉलेज याबाबत अजिबात समज नव्हती.

"मला अजिबात समज नव्हती. मी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा मला असं वाटायचं की, किस केल्यामुळे मुलं होतात."

"मला बेसिक बायोलॉजीही माहीत नव्हती. पार्टनरसोबत बोलल्यानंतरच तिला या सर्व गोष्टी कळल्या" असं सरगुनने सांगितलं.

अभिनेत्रीने '12/24 करोल बाग', 'फुलवा', 'बालिका वधू', 'क्या हुआ तेरा वादा', 'रिश्तों का मेला' सारखे टीव्ही शो केले आहेत.

पंजाबी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर सरगुन 'किस्मत', 'किस्मत 2', 'अंग्रेज', 'मोह', 'झल्ली'मध्ये दिसली आहे. तिने अनेक हिट पंजाबी म्युझिक व्हिडीओ केले आहेत.

अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सरगुन मेहताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.