'उन्हाळा संपला पण...'; श्रेया मिस करतीये व्हेकेशनचा काळ, शेअर केली स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:02 AM2024-06-12T11:02:06+5:302024-06-12T11:05:42+5:30

Shreya Bugde: श्रेयाच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

चला हवा येऊ द्या'चा हुकमी एक्का म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कॉमेडी क्वीन म्हणून श्रेयाकडे पाहिलं जातं.

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपल्यानंतर श्रेया सोनी टीव्हीवरील 'मॅडनेस मचाएंगे' या कार्यक्रमात दिसली होती.

लवकरच श्रेया झी मराठीवर सुरु होणाऱ्या drama juniors या नव्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

श्रेया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती चाहत्यांच्या भेटीला येत असते.

अलिकडेच श्रेया तिचं समर व्हेकेशनसाठी बाहेरगावी गेली होती. या व्हेकेशनमधील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रेयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कमालीची कूल दिसून येत आहे. सोबतच तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.

पिंक कलरचा शर्ट आणि त्यावर डेनिमची शॉर्ट्स असा लूक श्रेयाने केला आहे.