तू कोकणी असल्याचा गर्व! अंकिता वालावलकरच्या साडीच्या पदरावर नारळाचं झाड; 'कान्स'मधील लूक व्हायरल, चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:15 IST2026-05-18T16:02:35+5:302026-05-18T16:15:11+5:30

अंकिताने कान्सच्या रेड कार्पेटसाठी मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून ती रेड कार्पेटवर अवतरली.

Cannes 2026: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने हजेरी लावत कोकणची मान उंचावली.

अंकिताने कान्सच्या रेड कार्पेटसाठी मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून ती रेड कार्पेटवर अवतरली.

अंकिताच्या लूकमधूनही कोकणची झलक पाहायला मिळाली. तिच्या पदरावर नारळाच्या झाड कोरलेलं होतं.

केसांचा बन बांधून अगदी साधा लूक तिने केला होता. गळ्यात चोकर आणि मोत्याचे दागिने तिने घातले होते.

कोकण हार्टेड गर्लला कान्सच्या रेड कार्पेटवर पाहून चाहतेही सुखावले. अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

"कोकणची शान", "तू कोकणी असल्याचं अभिमान" अशा कमेंट चाहत्यांनी अंकिताच्या या फोटोंवर केल्या आहेत.

अंकिताचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूक चाहत्यांनाही आवडला आहे. अभिजात मराठी ओटीटी जागतिक लाँचसाठी अंकिता कान्समध्ये सहभागी झाली होती.