पार्थ भालेराव झळकणार ‘लालबागची राणी’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 01:00 IST2016-05-15T01:00:00+5:302016-05-15T01:00:00+5:30

लालबागची राणी या चित्रपटात वीणा जामकरसोबत जो बालकलाकार आहे त्याला ओळखलत का तुम्ही? त्याच नाव आहे पार्थ भालेराव. या मुलाच नाव ऐकायल्या सारखं वाटतं ना?

Partha Bhalerao will be seen in 'Lalbagh Ki Rani' | पार्थ भालेराव झळकणार ‘लालबागची राणी’मध्ये

पार्थ भालेराव झळकणार ‘लालबागची राणी’मध्ये

लालबागची राणी या चित्रपटात वीणा जामकरसोबत जो बालकलाकार आहे त्याला ओळखलत का तुम्ही? त्याच नाव आहे पार्थ भालेराव. या मुलाच नाव ऐकायल्या सारखं वाटतं ना? त्याला लालबागची राणी या चित्रपटाच्या पोस्टरवर बघितल्यावर या आधी कुठेतरी पाहिल्यासारखं पण वाटतं ना? अहो... हा तोच बिनधास्त कलाकार आहे ज्याने बिग बी अमिताभ बच्चनसोबत भुतनाथ रिटर्न्स या हिंदी चित्रपटात एकदमच अफलातून काम केलं होत. भूतनाथ रिटर्न्सनंतर किल्ला या मराठी चित्रपटातही त्याने काम केलं आहे. पार्थ आता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित लालबागची राणी या चित्रपटातून परत एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटामध्ये पार्थ हा वीणा जामकर या अभिनेत्रीसोबत काम करीत आहे. या सिनेमातील त्याचा एकंदरीतच लुक पाहता पार्थच्या वाट्याला नक्कीच चॅलेंजिंग रोल आल्याचे दिसून येते. भिक मांगता हूँ लेकीन इज्जत से असा डायलॉगच त्याच्या वाट्याला आल्याने त्याचा रोल किती इंटरेस्टिंग असणार आहे याची कल्पना आपल्याला आलीच असेल. दोन दर्जेदार सिनेमांमध्ये काम केल्यानंतर पार्थ आता लालबागची राणी या चित्रपटात काय वेगळे करतोय ते लवकरच समजेल.

Web Title: Partha Bhalerao will be seen in 'Lalbagh Ki Rani'