‘काहीही हा श्री’ नंतर ‘काहीही हा वी’

By Admin | Updated: February 27, 2017 02:46 IST2017-02-27T02:46:54+5:302017-02-27T02:46:54+5:30

‘प्रेम हे’ या मालिकेत तेजश्री प्रधानसोबत वैभव तत्त्ववादी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

'Nothing is shri' then 'nothing hai' | ‘काहीही हा श्री’ नंतर ‘काहीही हा वी’

‘काहीही हा श्री’ नंतर ‘काहीही हा वी’


मुंबई - ‘प्रेम हे’ या मालिकेत तेजश्री प्रधानसोबत वैभव तत्त्ववादी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तेजश्री आणि वैभवने ‘प्रेम हे’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या मालिकेतील चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची खूपच चांगली मैत्री झाली असल्याचे म्हटले जात आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री या व्यक्तिरेखेला काहीही हा श्री, असे जान्हवी म्हणजेच तेजश्रीने म्हणणे खूपच गाजले होते. यावर अनेक जोक्सदेखील सोशलमीडियावर व्हायरल झाले होते. तेजश्री आता ‘प्रेम हे’ या मालिकेच्या सेटवर काहीही हा वी असे म्हणत सतत वैभवला चिडवत असल्याचे कळतेय. त्यामुळे आता ‘काहीही हा श्री’ ची जागा ‘काहीही हा वी’ने घेतली आहे असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: 'Nothing is shri' then 'nothing hai'