नानांची बाइक रायडिंग

By Admin | Updated: February 25, 2016 03:39 IST2016-02-25T03:39:43+5:302016-02-25T03:39:43+5:30

सलमान खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांसारख्या सुपस्टारचे बाइकबद्दल असलेले खास प्रेम आपल्याला माहिती आहेच. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वसामान्यांच्या मनात

Nancy Bike Raiding | नानांची बाइक रायडिंग

नानांची बाइक रायडिंग

सलमान खान, हृतिक रोशन, जॉन अब्राहम यांसारख्या सुपस्टारचे बाइकबद्दल असलेले खास प्रेम आपल्याला माहिती आहेच. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वसामान्यांच्या मनात विशेष घर निर्माण करणाऱ्या नानांनासुद्धा बाइक चालवायला फार आवडते, हे तुम्हाला माहीत होते का... नानांच्या चाहत्यांनी नानांना कधी बुलेट चालवताना पाहिले आहे का... नाही ना. नानांचा बाइक चालवतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच झळकत आहे. या फोटोमध्ये नाना कूल लूकमध्ये दिसत आहेत. त्यांनी खाकी रंगाचे जॅकेट, गॉगल, गळ्यात लॉकेट व त्यांच्या पेहरावाला शोभेल, असे लेदर शूज घातले आहेत. हा त्यांचा हॉट लूक एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे, यात काही शंकाच नाही हे नक्की. इतर चित्रपटसृष्टीतील सुपस्टारप्रमाणे याही सुपस्टारला बाइक चालवण्याचा मोह आवरता आला नाही, हे नक्की.

Web Title: Nancy Bike Raiding