"मेरे करन-अर्जुन आएंगे..."; हिंदी सिनेमातील आईंचा इमोशनल ड्रामा, डायलॉग असे जे आजही लोकांना तोंडपाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:39 IST2026-05-10T14:35:29+5:302026-05-10T14:39:22+5:30
Bollywood Maa Dialogues: ‘मदर्स डे 2026’च्या (Mothers Day 2026) निमित्ताने बॉलिवूडमधील त्या आयकॉनिक आईंची पुन्हा एकदा आठवण काढली जात आहे, ज्यांचे डायलॉग आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. निरूपा रॉय, राखी गुलजार, फरीदा जलाल, रीमा लागू आणि नर्गीस यांसारख्या अभिनेत्रींनी पडद्यावर आईची भूमिका इतकी प्रभावीपणे साकारली की त्यांचे संवाद आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

"मेरे करन-अर्जुन आएंगे..."; हिंदी सिनेमातील आईंचा इमोशनल ड्रामा, डायलॉग असे जे आजही लोकांना तोंडपाठ
Iconic Bollywood Maa Dialogues : "मेरे करण अर्जुन आएंगे!" हा हिंदी सिनेमातील डायलॉग आजही इतका लोकप्रिय आहे की, लोक रोज कधीना कधी बोलतात. असे कितीतरी बॉलिवूडमधील आईच्या पात्रांचे डायलॉग आजही बोलले जातात. हिंदी सिनेमांमध्ये आईचे पात्र नेहमीच इमोशनल राहिले आहे. कितीतरी सिनेमातील आईचे डायलॉग इतके लोकप्रिय झाले की ते लोकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनले. काही डायलॉग ऐकले की आपल्यालाच आपल्या आईची आठवण येते. आपण पाहिलं असेल की, जुन्या सिनेमांमध्ये आई मुलांसाठी सर्व दुःख सहन करणारी, त्याग करणारी आणि कायम आधार देणारी दाखवली जायची. वेळ पडली तर पतीच्या विरोधात जाणारी सुद्धा दाखवली आहे. पुढच्या काळात आईच्या व्यक्तिरेखेत बरेच बदल झाले, पण तिच्या भावना मात्र तशाच राहिल्या.
प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या बॉलिवूड आई
आई सिनेमातील भूमिका हा विषय निघाला की, सगळ्यात आधी डोळ्यांसमोर चेहरा येतो तो निरूपा रॉय यांचा. सगळ्यांनाच कल्पना असेल की, निरूपा रॉय यांना बॉलिवूडची “सर्वात भावनिक आई” म्हटलं जायचं. त्यांच्या डोळ्यातील वेदना आणि संवादातील माया प्रेक्षकांना थेट भिडायची. फरीदा जलाल यांनी अनेक सिनेमात प्रेमळ आणि समजूतदार आईची भूमिका साकारली, तर रीमा लागू यांनी आधुनिक आणि मैत्रीपूर्ण आईची नवी ओळख निर्माण केली. राखी गुलजार यांची 'करन-अर्जुन' आणि नर्गीस यांची 'मदर इंडिया' सिनेमातील भूमिका देखील आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.
डायलॉग जे आजही आठवतात
बॉलिवूडमधील अनेक आईंचे डायलॉग इतके लोकप्रिय झाले की ते केवळ सिनेमापुरते मर्यादित राहिले नाहीत. आशीर्वाद देणारे शब्द असोत किंवा मुलांना समजावणारे प्रत्येक डायलॉगमध्ये आईची माया आणि काळजी दिसून येत होती. यामुळेच आजही जेव्हा बॉलिवूडमधील आयकॉनिक आईंची चर्चा होते, तेव्हा या अभिनेत्रींची नावे सर्वात आधी घेतली जातात आणि जुन्या चित्रपटांच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.
बॉलिवूडमधील आईंचे सगळ्यात लोकप्रिय डायलॉग्स
1. ‘दीवार’ सिनेमात निरूपा रॉय
‘तू अभी इतना भी अमीर नहीं हुआ कि अपनी मां को खरीद सके!’
2. ‘मदर इंडिया’ सिनेमात नर्गीस
‘मेरे दूध का कर्ज चुकाने का वक्त आ गया है’
3. ‘गोलमाल’ सिनेमात दीना पाठक
‘क्या इसी दिन के लिए तुम्हें पाल-पोस कर बड़ा किया था?’
4. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमात फरीदा जलाल
‘जब लड़की जवान हो जाती है ना... तो मां उसकी मां नहीं रहती... सहेली बन जाती है’
5. ‘मुगल-ए-आजम’ सिनेमात दुर्गा खोटे
‘ये सुहाग का टीका कहीं मां के दिल का दाग न बन जाए’
6. ‘खानदान’ सिनेमात ललिता पवार
‘चुड़ैल! कीड़े पड़ें तुझे’
7. ‘करण अर्जुन’ सिनेमात राखी
‘मेरे करण-अर्जुन आएंगे!’
8. ‘हम आपके हैं कौन..!’ सिनेमात रीमा लागू
‘देखिए जी, आप मेरे लाल को ऐसे मत डांटिए’
9. ‘फिजा’ सिनेमात जया बच्चन
‘मां की बद्दुआ भी दुआ बनकर लगती है’
10. ‘ओम जय जगदीश’ सिनेमात वहीदा रहमान
‘जब तू छोटा था, बोल नहीं सकता था... तो मुझे तेरी हर बात समझ में आती थी... अब तू इतना बड़ा हो गया है और हर लफ्ज साफ-साफ बोलता है... तो मुझे तेरी कोई बात समझ में नहीं आती’