रॅपर श्रेयश जाधव करणार चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 14:58 IST2018-01-29T09:28:21+5:302018-01-29T14:58:21+5:30

मराठी रॅपचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव, चित्रपट निर्मितीबरोबरच आता आपल्या लेखन-दिग्दर्शनाने लोकांचे मनोरंजन करणार ...

Writing and directing of the film by rapper Shreyash Jadhav | रॅपर श्रेयश जाधव करणार चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन

रॅपर श्रेयश जाधव करणार चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन

ाठी रॅपचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव, चित्रपट निर्मितीबरोबरच आता आपल्या लेखन-दिग्दर्शनाने लोकांचे मनोरंजन करणार आहे. गणराज असोसिएट्सच्या बॅनरखाली सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणाऱ्या श्रेयशला मराठी सिनेसृष्टीत तरुण निर्माता म्हणून संबोधले जाते, तसेच आता त्याने दिग्दर्शनात आपले पाऊल टाकले असून तरुण लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपली नवी ओळख निर्माण करायला तो सज्ज झाला आहे. त्याचे ' पुणे रॅप' आणि 'वीर मराठे' यांसारखे धडाकेबाज रॅप लोकांना आवडत असल्यामुळे, त्याच्या लेखन आणि दिग्दर्शकीय नजरेतून साकार होत असलेल्या त्याच्या पहिल्याच सिनेमाचे त्याच्या चाहत्यांना उत्सुकता नसेल तर नवलच!
चित्रपटाचा निर्माता म्हणून असो वा रॅपर सिंगर म्हणून असो, श्रेयशला रसिकांचे आतापर्यंत अमाप प्रेम लाभले आहे, त्यामुळे त्याचे दिग्दर्शकीय पाऊल कुतूहलाचा विषय ठरणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात होणार असून शीर्षक आणि स्टारकास्टबाबत तुर्तास श्रेयशने मौन राखणेच पसंत केले आहे. त्यामुळे श्रेयशकडून लेखक-दिग्दर्शक म्हणून एका नवीन धाटणीचा सिनेमा लोकांना बघायला मिळेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.
आम्ही पुणेरी आणि वीर मराठे या मराठमोळ्या रॅप साँगच्या यशानंतर खास आपल्या चाहत्यांसाठी श्रेयशने फकाट पार्टी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या गाण्याला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणाऱ्या या पार्टी साँगला हर्ष, करण, अदित्य यांनी संगीत दिले होते तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरियोग्राफी केली होती. श्रेयशने गायलेल्या या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात १०० ग्लॅमरर्स मॉडेल्सना घेण्यात आले होते. तसेच त्यात फॉरेनर्सचादेखील समावेश होता.
श्रेयशच्या एकामागोमाग एक हिट होत असलेल्या रॅप साँगमुळे तो मराठी पॉप इंडस्ट्रीमध्ये एक नवीन क्रांती आणतोय. आता त्याची नवीन इनिंग प्रेक्षकांना आवडते की नाही हे लवकरच आपल्याला कळेल.

Web Title: Writing and directing of the film by rapper Shreyash Jadhav