प्राजक्ता माळीचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो पारंपरिक की वेस्टर्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 12:38 IST2017-09-01T07:08:45+5:302017-09-01T12:38:45+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे अल्पावधीत रसिकांची लाडकी बनली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी ...

Which prediction of Pradakta Mali did you believe in Traditional Western? | प्राजक्ता माळीचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो पारंपरिक की वेस्टर्न ?

प्राजक्ता माळीचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो पारंपरिक की वेस्टर्न ?

िनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे अल्पावधीत रसिकांची लाडकी बनली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. याआधीही तिने सुवासिनी, बंध रेशमाचे, गाणे तुमचे आमचे, सुगरण अशा मालिकांमध्ये काम केलं होतं. खो-खो, संघर्ष, गोळाबेरीज अशा मराठी सिनेमांमध्येही प्राजक्ताने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्राजक्ताची नकटीच्या लग्नाला यायचं हं, ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेतील प्राजक्ताचा खट्याळ अंदाज आणि पारंपरिक लूक रसिकांना चांगलाच भावतो आहे. अभिनयासह तिचा लूक चर्चेचा विषय ठरतो आहे. मराठमोळ्या घरातील मराठमोळी मुलगी साकारणारी प्राजक्ता रसिकांची फेव्हरेट ठरत आहे. याआधी विविध मालिकांमध्येही प्राजक्ता माळीचा मराठमोळा लूक रसिकांना भावला होता. पारंपरिक साडीतील तिचा मराठमोळा लूक रसिकांवर जादू करुन गेला. कधी ड्रेस घालून फेटा परिधान करुन तिने रसिकांची मनं जिंकली. तिचा पारंपरिक अंदाज तिच्या फॅन्सना आवडला. तिच्या पारंपरिक लूकची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा तिच्या बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाजाचीही झाली. आकर्षक  काळ्या रंगाचा टॉप, तितक्याच घायाळ करणा-या अदा, मोकळे सोडलेले केस असा प्राजक्ताचा सेक्सी अंदाजही रसिकांनी पाहिला आहे. पारंपरिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये प्राजक्ताने रसिकांवर मोहिनी घातली. प्राजक्ताचा साडी आणि ड्रेस परिधान केलेला अंदाज रसिकांना जितका आवडतो, तितकाच तिच्या वेस्टर्न लूकचीही जोरदार चर्चा होते. तिच्या दोन्ही अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर रसिकांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. त्यामुळे आता तुम्हीही सांगा तुम्हाला प्राजक्ताचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो, पारंपरिक की वेस्टर्न ?   

Web Title: Which prediction of Pradakta Mali did you believe in Traditional Western?