उपेंद्र आणि वीणाची जमली जोडी, झळकणार 'आणीबाणी' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:00 PM2023-07-06T15:00:02+5:302023-07-06T15:00:50+5:30

Upendra Limaye And Veena Jamkar : अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री वीणा जामकर हे लवकरच रुपेरी पडद्यावर ग्रामीण अंदाजात पाहायला मिळणार आहेत.

The pairing of Upendra and Veena will be seen in the movie 'Emergency' | उपेंद्र आणि वीणाची जमली जोडी, झळकणार 'आणीबाणी' सिनेमात

उपेंद्र आणि वीणाची जमली जोडी, झळकणार 'आणीबाणी' सिनेमात

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) आणि अभिनेत्री वीणा जामकर (Veena Jamkar) हे लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ते दोघे आणीबाणी चित्रपटात दिसणार आहेत. हे दोन चतुरस्त्र कलाकार आता 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’  या मराठी चित्रपटातून जोडीच्या रूपाने ग्रामीण अंदाजात दिसणार आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. २८ जुलैला ‘आणीबाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय चित्रपटातून रंजकपणे मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील नायकाच्या, अभिमन्यूच्या भूमिकेत उपेंद्र लिमये तर त्याच्या पत्नीच्या म्हणजेच विमलच्या भूमिकेत वीणा जामकर आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमच्या मैत्रीमुळे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावरही चांगलीच खुलली असल्याचं या दोघांनी सांगितले.  केवळ मनोरंजन एवढा एकच निकष सध्या मराठी चित्रपटांना लागू नाही. अनेक सामाजिक विषयही आज उत्तम प्रकारे हाताळले जात आहेत. ‘आणीबाणी’ चित्रपटाचा वेगळा विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

Web Title: The pairing of Upendra and Veena will be seen in the movie 'Emergency'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.