झाला बोभाटा लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:59 IST2016-12-01T16:59:18+5:302016-12-01T16:59:18+5:30

मराठी चित्रपसृष्ट्रीत सध्या विविध विषयांवर नवीन चित्रपट येत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्ट्रीतील नवीन विषयीदेखील प्रेक्षकांच्या ...

Soon after | झाला बोभाटा लवकरच

झाला बोभाटा लवकरच

ाठी चित्रपसृष्ट्रीत सध्या विविध विषयांवर नवीन चित्रपट येत असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्ट्रीतील नवीन विषयीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. यातील  काही ग्रामीण भागांवर आधारित असतात तर काही सामाजिक परिस्थितीवर. हेच विषय समाजात जनजागृती करण्याचे काम करत असतात. आता असाच एक आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झाला बोभाटा असे या चित्रपटाचे नाव आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  यावेळी या चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.झाला बोभाटा हा चित्रपट एका गावावर चित्रीत करण्यात आला आहे. आता गाव आलं की बारा भानगडी आल्या आणि त्यात ती मान्याची वाडी तर अग्रेसरच म्हणा. मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले हे गावकरी. या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गावकरी पुन्हा एकत्र येतात, नेमकी काय भानगड आहे हे प्रेक्षकांना पाहण्यासाठी तुम्हांला ६ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, दिपाली आंबिकार, तेजा देवकर, मयूरेश पेम, मोनालिसा बागल, रोहित चव्हाण या कलाकारांचा समावेश आहे. किंग क्रिएशन आणि डीजी टेक्नो इंटरप्राईझेस प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. येत्या ६ जानेवारीला हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Soon after