"स्त्री शक्तीचा जागर..." प्राजक्ता माळी अन् तेजस्विनी पंडितसाठी सोनाली कुलकर्णीची पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 19:03 IST2024-10-11T19:00:18+5:302024-10-11T19:03:58+5:30

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोन्हीही लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

sonalee Kulkarni Shere Post For Prajakta Mali And Tejaswini Pandit | Phullwanti Movie | "स्त्री शक्तीचा जागर..." प्राजक्ता माळी अन् तेजस्विनी पंडितसाठी सोनाली कुलकर्णीची पोस्ट!

"स्त्री शक्तीचा जागर..." प्राजक्ता माळी अन् तेजस्विनी पंडितसाठी सोनाली कुलकर्णीची पोस्ट!

 सौंदर्य, अभिनय आणि इतर कलागुण यामुळे अभिनेत्रींमध्ये काम मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा असते. यातूनच अभिनेत्रींमध्ये एकमेकींबद्दल प्रचंड ईर्षा, द्वेष आणि कधी कधी संघर्षसुद्धा पाहायला मिळतो. पेज-थ्री दुनियेच्या शब्दांत सांगायचं झालं तर अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळते. पण, अशाही काही अभिनेत्री आहेत, ज्या एकमेकींचे कौतुक करताना दिसून येतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. 

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोन्हीही लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आता दोन्ही या अभिनेत्री निर्माती बनल्या आहेत. उद्या प्राजक्ता माळीचा फुलंवती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा  प्राजक्ताचा पहिलाच निर्मित सिनेमा आहे. तर तेजस्विनी पंडित निर्माती असलेला सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोनालीने आपल्या या दोन्ही मैत्रिंणीना  शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.  


सोनालीने लिहलं, "या नवरात्रोत्सवात माझ्या दोन अभिनेत्री - मैत्रिणी तेजस्वीनी पंडती आणि प्राजक्ता माळी या "निर्मिती" क्षेत्रात दमदार पदार्पण करतायत… अतिशय भव्यदिव्य स्वरूपात त्यांचे हे दोन दैदिप्यमान सिनेमे प्रदर्शित होत आहेत…. स्त्री शक्तीचा खऱ्या अर्थाने जागर होत आहे. या महिला निर्मात्यांचे अभिनंदन. blockbuster शुभेच्छा". तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. 
 

Web Title: sonalee Kulkarni Shere Post For Prajakta Mali And Tejaswini Pandit | Phullwanti Movie