Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' सिनेमाची 'ऐतिहासिक' कमाई! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 11:24 IST2026-05-02T11:23:29+5:302026-05-02T11:24:29+5:30
'राजा शिवाजी' सिनेमाला अॅडव्हान्स बुकींगमध्येच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा सिनेमा कमाईचे नवनवीन विक्रम मोडणार हे उघड होतं. '

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' सिनेमाची 'ऐतिहासिक' कमाई! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वांना एका सिनेमाची उत्सुकता होती ती म्हणजे 'राजा शिवाजी'. रितेश देशमुख लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आपल्या सर्वांसमोर आणत आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाला अॅडव्हान्स बुकींगमध्येच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा सिनेमा कमाईचे नवनवीन विक्रम मोडणार हे उघड होतं. 'राजा शिवाजी' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, जाणून घ्या
'राजा शिवाजी' सिनेमाची कमाई किती?
सैकनिल्कच्या अहवालानुसार 'राजा शिवाजी' सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल ११.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाच्या मराठी आवृत्तीने ८ कोटी तर हिंदी आवृत्तीने ३.३५ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे 'राजा शिवाजी' पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी करताना दिसत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण 'राजा शिवाजी' सिनेमा थिएटरमध्ये पाहायला जात आहेत. विशेष म्हणजे, शनिवार-रविवार वीकेंडच्या निमित्ताने 'राजा शिवाजी' सिनेमा आणखी चांगली कमाई करेल यात शंका नाही.
'राजा शिवाजी' सिनेमाविषयी
‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटाविषयी सांगायचं तर, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे. विशेष म्हणजे रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून, त्यांच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प अधिक भव्य स्वरूपात साकारला गेला आहे.