प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर जोडीचा हिरकणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 10:38 IST2017-03-08T05:08:09+5:302017-03-08T10:38:09+5:30

प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर हे केवळ सहकलाकार नसून ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे चिन्मयच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ...

Prasad Oak and Chinmay Mandlekar pair of Hirakani | प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर जोडीचा हिरकणी

प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर जोडीचा हिरकणी

रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर हे केवळ सहकलाकार नसून ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे चिन्मयच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रसाद असतोच. प्रसाद लवकरच कच्चा लिंबू हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करत आहे. प्रसादची दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटात एक सामाजिक विषय मांडण्यात आलेला आहे. या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा हे चिन्मय मांडलेकरने लिहिले आहेत. कच्चा लिंबू या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा चिन्मय आणि प्रसादची जोडी प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहे.
इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. आई या शब्दांचे सामर्थ्य सांगणारी ही कथा आधुनिक स्त्रीच्या जीवनाशी अगदी मिळती-जुळतीच म्हणावी लागेल. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरचा एक अवघड बुरुज काळ्याभिन्न अंधारात, आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून येणाऱ्या या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. मातृत्वाच्या याच धाडसाची गाथा प्रेक्षकांना हिरकणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

chinmay mandlekar
प्रसाद ओक हिरकणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाद्वारे आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. 
या चित्रपटाची कथा लेखक प्रताप गंगावणे यांनी लिहिली असून चिन्मय मांडलेकरने या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. हिरकणी या इतिहासकालीन चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत कोणती नायिका असणार आहे, हे सध्या तरी गुपित ठेवण्यात आले आहे. तसेच या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार असणार याबाबतदेखील सध्या मौन राखण्यात आले आहे. 
  


Web Title: Prasad Oak and Chinmay Mandlekar pair of Hirakani