मिथिलाची स्टाईल स्टेटमेंट होतेय व्हायरल, फॅन्सना पडली तिची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 17:06 IST2020-02-10T16:57:33+5:302020-02-10T17:06:20+5:30

तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत

Mithila palkar share her ethnic look photo on instagram | मिथिलाची स्टाईल स्टेटमेंट होतेय व्हायरल, फॅन्सना पडली तिची भुरळ

मिथिलाची स्टाईल स्टेटमेंट होतेय व्हायरल, फॅन्सना पडली तिची भुरळ

गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने ड्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय. सिंपल लूकमध्ये मिथिला खूपच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

Web Title: Mithila palkar share her ethnic look photo on instagram