ही मराठी अभिनेत्री चक्क नाश्त्याला खाते आईस्क्रिम, तिने स्वत:चा केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:00 IST2020-04-14T07:00:00+5:302020-04-14T07:00:00+5:30

इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Mithila palkar eat ice cream for breakfast said on insta gda | ही मराठी अभिनेत्री चक्क नाश्त्याला खाते आईस्क्रिम, तिने स्वत:चा केला हा खुलासा

ही मराठी अभिनेत्री चक्क नाश्त्याला खाते आईस्क्रिम, तिने स्वत:चा केला हा खुलासा

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.


मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते. मिथिलाने आईस्क्रिमसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत मिथिलाने एक कॅप्शन दिले आहे. यात तिने लिहिले आहे की,'' हो, मी ब्रेकफास्टला आईस्क्रिम खाते.'' असे तिने लिहिले आहे. यावर तिच्या फॅन्सनी संमिश्र कमेंट्स केल्या आहेत. 


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

 

Web Title: Mithila palkar eat ice cream for breakfast said on insta gda