​जाणून घ्या प्रिया बापटने कसा सुरू केला वर्षातील पहिला दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 17:03 IST2018-01-01T11:31:00+5:302018-01-01T17:03:22+5:30

२०१८ साल उजाडले असून या वर्षी नवीन काय करायचे याचे संकल्प सगळ्यांनी केले आहेत. या संकल्पांमध्ये सेलिब्रिटी देखील मागे ...

Learn How Priya Bapat started the first day of the year | ​जाणून घ्या प्रिया बापटने कसा सुरू केला वर्षातील पहिला दिवस

​जाणून घ्या प्रिया बापटने कसा सुरू केला वर्षातील पहिला दिवस

१८ साल उजाडले असून या वर्षी नवीन काय करायचे याचे संकल्प सगळ्यांनी केले आहेत. या संकल्पांमध्ये सेलिब्रिटी देखील मागे नाहीत. सेलिब्रिटी हे नेहमीच त्यांच्या फिटनेसबद्दल सतर्क असल्याने या वर्षी देखील तितकेच फिट राहायचे असा संकल्प करत अनेकांनी वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच जीममध्ये घाम गाळायला सुरुवात केली आहे.  
सध्या बॉलिवूडच्या कलाकारांइतकेच मराठी कलाकार देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या फॅन्सना सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने त्यांच्या फॅन्सना शुभेच्छा देण्यासाठी आपली खास स्टाइल निवडली आहे. प्रिया बापटने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना शुभेच्छा देण्यासाठी एक आगळा वेगळा मार्ग निवडला आहे. प्रियाने एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या फॅन्सना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Also Read : उमेश कामत सांगतोय प्रिया बापटने त्याच्या वाढदिवसाला दिले होते हे सरप्राईज


प्रिया बापट फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे आणि त्यामुळेच तिने तिचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून तिने वर्षाची सुरुवात कशी केली हे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. त्याचसोबत तिच्या फॅन्सना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या फॅन्सने देखील तिच्या या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रियाच्या या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केले आहे तसेच यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. यावरून प्रियाने या वर्षी देखील तितकेच फिट राहायचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे. 
प्रिया बापटने शुभंकरोती, दामिनी, अधुरी एक कहानी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच वजनदार, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, टाइम पास, काकस्पर्श यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. तिचा गच्ची हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. एवढेच नव्हे तर मुन्नाबाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नवा गडी नवा राज्य हे तिचे नाटक देखील प्रचंड गाजले होते. आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी तिला एक मानले जाते.  

Web Title: Learn How Priya Bapat started the first day of the year