​हंसराज जगताप करणार हिंदी चित्रपटात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 14:15 IST2018-01-01T08:45:11+5:302018-01-01T14:15:11+5:30

हंसराज जगतापने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या आजवरच्या अनेक भूमिकांचे कौतुक झालेले आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला ...

Hansraj Jagtap doing Hindi film work | ​हंसराज जगताप करणार हिंदी चित्रपटात काम

​हंसराज जगताप करणार हिंदी चित्रपटात काम

सराज जगतापने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या आजवरच्या अनेक भूमिकांचे कौतुक झालेले आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्याने धग या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या भूमिकेचे समीक्षकांनी देखील चांगलेच कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या होत्या. त्यानंतर त्याने आयटमगिरी, झिपऱ्या, स्लॅमबुक, यारी-दोस्ती यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि आता हंसराज एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील त्याने सुरुवात केली आहे. हा चित्रपट हंसराजच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा असून या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वेगळी असणार आहे.  
हंसराज आता नक्षलवाद्यांवर आधारित एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात त्याच्यासोबतच संजय मिश्रा, अखिलेंद्र मिश्रा, विजय राज यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण झाले असून काही भागांचे चित्रीकरण पुढील काहीच दिवसांत होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच झारखंड य़ेथे करण्यात आले. या चित्रीकरणाचा त्याचा अनुभव खूपच चांगला होता. 
हंसराज जगताप हा मुळचा बीडचा असून त्याचे शालेय शिक्षण तिथेच झालेले आहे. सध्या तो कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याच्या घरातील कोणीच अभिनयक्षेत्राशी संबंधित नाहीये. त्याचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून त्याला एक भाऊ आणि बहीण आहे. औरंगाबाद मधील ललित कला महोत्सवात त्याची आणि अभिनेता मंगेश देसाईची ओळख झाली होती. मंगेश देसाईनेच त्याला अभिनयक्षेत्रात करियर करण्याविषयी मागदर्शन केले. हंसराज हा खूप चांगला डान्सर आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून भरतनाट्यम शिकत आहे. 
मराठीत अतिशय चांगल्या भूमिका साकारल्यानंतर हंसराज हिंदीतही तितकीच दमदार भूमिका साकारेल अशी त्याच्या फॅन्सना खात्री आहे. 

Also Read : हंसराज जगतापवर का आली परीक्षा सोडण्याची वेळ?

Web Title: Hansraj Jagtap doing Hindi film work