निर्मिती सावंत, भरत जाधव यांचा हा सिनेमा कोणता ओळखलं का तुम्ही? फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:06 PM2023-10-31T12:06:38+5:302023-10-31T12:15:47+5:30

Marathi cinema: सध्या एका गाजलेल्या सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Did you recognize this marathi movie of Nirvana Sawant Bharat Jadhav | निर्मिती सावंत, भरत जाधव यांचा हा सिनेमा कोणता ओळखलं का तुम्ही? फोटो होतोय व्हायरल

निर्मिती सावंत, भरत जाधव यांचा हा सिनेमा कोणता ओळखलं का तुम्ही? फोटो होतोय व्हायरल

मराठी सिनेसृष्टीत आजवर अनेक दर्जेदार,आशयघन सिनेमांची निर्मिती झाली आहे. काही सिनेमांमधून समाजप्रबोधन झालं तर काही सिनेमांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात आलं. त्यामुळे मराठीतील प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर कायम चर्चेत येत असतो. आज या सिनेसृष्टीत अनेक सिनेमांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, यात असे काही जुने सिनेमा आहेत ज्यांची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. सध्या अशाच एका गाजलेल्या सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर निर्मिती सावंत( nirmiti sawant), भरत जाधव (bharat jadhav), मकरंद अनासपुरे (makarand anaspure) आणि पंढरीनाथ कांबळे (pandharinath kamble) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.  हा फोटो पाहिल्यावर तो एखाद्या चित्रपटातील मजेशीर सीन असल्याचं लक्षात येत आहे. परंतु, हा सिनेमा नेमका कोणता असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.  इतकंच कशाला तर अभिनेता भरत जाधव यानेही सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत हा सिनेमा ओळखला का? असं विचारलं आहे.

व्हायरल होत असलेला हा फोटो खबरदार या मराठी सिनेमातील आहे.  मारुती कांबळे ( संजय नार्वेकर) याला वाचवण्यासाठी खबरदार वृत्तपत्राची टीम कशाप्रकारे त्याला मदत करते असा हा सीन होता.  विशेष म्हणजे या सीनमध्येही लहान लहान ठिकाणी विनोद निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे हा सीन उत्तम झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांना भरभरुन प्रेम दिलं होतं.

Web Title: Did you recognize this marathi movie of Nirvana Sawant Bharat Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.