आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज..; दीपा-अंकुशच्या आयुष्यात घडला दुग्धशर्करा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 10:49 AM2024-03-17T10:49:12+5:302024-03-17T10:50:07+5:30

झी चित्र गौरव 2024 सोहळ्यात दीपा - अंकुशच्या बाबतीत एक खास गोष्ट घडलीय

Deepa parab chaudhari posted picture with Ankush chaudhari and revealed a special story | आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज..; दीपा-अंकुशच्या आयुष्यात घडला दुग्धशर्करा योग

आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज..; दीपा-अंकुशच्या आयुष्यात घडला दुग्धशर्करा योग

नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या शानदार सोहळ्याचे फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सोहळ्यासाठी अंकुश चोधरी आणि दीपा परब ही कलाकार जोडी उपस्थित होती. यानिमित्ताने दीपाने खास फोटो पोस्ट करुन मनातल्या भावना व्यक्त केल्यात. विशेष म्हणजे यंदाच्या झी चित्र गौरवसाठी अंकुश-दीपा दोघांनाही पुरस्कार मिळाले. 

दीपाने अंकुशसोबत हातात ट्रॉफी घेतानाचा फोटो पोस्ट करुन लिहीलंय की, "दुग्धशर्करा योग..! २०२३ हे वर्ष खूप सुंदर गेलंच पण २०२४ ची सुरुवात देखील तितकीच सुंदर आणि आनंद देणारी आहे. यावर्षी झी चित्र गौरव २०२४ सोहळ्यात आम्हा दोघांनाही ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटांसाठी अवॉर्ड्स मिळाले आणि हे शक्य होण्यासाठी त्यामागील एकमेव दुवा म्हणजे यशस्वीपणे दोन्ही चित्रपटांची धुरा सांभाळणारा कॅप्टन ऑफ द शिप… दिग्दर्शक केदार शिंदे."

दीपा पुढे लिहीते, "शाहिरांच्या भूमिकेसाठी अंकुशची निवड असो वा माझ्या इंडस्ट्रीतील कमबॅकसाठी बाईपण सारखा चित्रपट तुझी दूरदृष्टी आणि आम्हा दोघांवरील विश्वास यामुळेच आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज हातात असतात. हे दोन्ही चित्रपट आणि ह्या असंख्य आठवणी नेहमीच आमच्या मनात घर करून राहतील." अशाप्रकारे दीपाने तिचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला असुन दोघांचंही त्यांच्या फॅन्सने अभिनंंदन केलंय."
 

Web Title: Deepa parab chaudhari posted picture with Ankush chaudhari and revealed a special story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.