चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशीचा 'दिल मलंगी', मुहूर्त संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 19:46 IST2023-06-22T19:46:20+5:302023-06-22T19:46:51+5:30

एका विलक्षण कथा-कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अॅक्शन फँटसी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला.

Chinmay Udgirkar, Nakshatra Medhekar and Meera Joshi's 'Dil Malangi', Muhurta | चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशीचा 'दिल मलंगी', मुहूर्त संपन्न

चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशीचा 'दिल मलंगी', मुहूर्त संपन्न

एका विलक्षण कथा-कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अॅक्शन फँटसी चित्रपटाचा त्यांच्या 'दिल मलंगी' या महत्वाकांक्षी चित्रपटाचा मुहूर्त मुंबई, मढ येथील 'शनाया' या आलिशान ठिकाणी नुकताच करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी, नारायण जाधव, विनम्र भाबल, निर्माते रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले, प्रमोद मुरकुटे, दिग्दर्शक सुनिल परब यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

'दिल मलंगी' या अॅक्शन फँटसी चित्रपटाची कथा प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या सरळमार्गी, स्वप्नाळू सतेज ढाणे पाटील या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्याचं खुल्लम खुल्ला प्रेम होतं...पण ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाईमपास करतेय हे लक्षात आल्यावर 'प्रेम' ह्या संकल्पने वरचा त्याचा विश्वास उडतो... साहजिकच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या बळावर तो 'ग्लोबल ट्रान्स मिडिया' या जाहिरात एजन्सीचे सर्वेसर्वा हर्षवर्धन मराठे यांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो. मात्र 'मुंबई नगरी'तल्या दैंनदिन धक्काधकीच्या प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट हर्षवर्धन यांना खटकते, ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरु होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते... उत्कंठा शिगेला पोहोचविणारी ही फँटसी मनोरंजनाचं अनोखं सरप्राईज असणार आहे. 

माझ्या करिअरमधली हटके लव्हस्टोरी - चिन्मय उद्गीरकर

अभिनेता चिन्मय उद्गीरकर म्हणाला, "मी अनेक मालिकांमधून, चित्रपटातून काम केलंय... लव्हस्टोरीजमधून काम केले आहे. पण 'दिल मलंगी' चित्रपटाच्या माध्यमातून जी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे ती माझ्या करिअरमधली पहिली हटके लव्हस्टोरी आहे. अशक्य वाटावी अशी ही प्रेमकथा आहे." 

अगदी माझ्या मनासारखं घडतंय - नक्षत्रा
चित्रपटाची नायिका अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर म्हणते, "मला मेकअप तसाही कमी करायला आवडतो. 'दिल मलंगी' या चित्रपटात माझी भूमिकाच अशी आहे की तिथं 'नो मेकअप लूक' हा सध्याचा ट्रेन्डिंग लूक मला करायला मिळणार आहे. जे अगदी माझ्या मनासारखं पहिल्यांदाच घडतंय.'', तर अभिनेत्री मीरा जोशी म्हणाली, ''मी पहिल्यांदाच रोमान्स करताना दिसणार आहे. यामुळे माझी पडद्यावरची इमेज नक्कीच ब्रेक होणार.." 

'सदगुरु एंटरटेनमेंट', दीपलक्ष्मी निर्मित' 'दिल मलंगी' अत्यंत मनमोहक कथा 'दिल मलंगी'ची असून आजच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक संदेशाची खुसखुशीत झालर असलेले हे मनोरंजन करण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम ऍक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. आघाडीचे लेखक स्वप्निल गांगूर्डे यांची कथा असून पटकथा स्वप्निल गांगूर्डे, प्रथमेश शिवलकर तर संवाद 'हास्यजत्रा फेम' अभिनेता प्रथमेश शिवलकर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उद्गीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, भक्ती रत्नपारखी, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, अपूर्वा गोरे, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Chinmay Udgirkar, Nakshatra Medhekar and Meera Joshi's 'Dil Malangi', Muhurta