'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, या दिवशी छोट्या पडद्यावर होणार टेलिकास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 15:58 IST2020-07-18T15:57:32+5:302020-07-18T15:58:10+5:30

'टकाटक' मराठी चित्रपट बोल्ड सीन्समुळे खूप चर्चेत आला होता. 

This bold song from 'Takatak' Movie broke all records, will be telecast on the small screen this day | 'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, या दिवशी छोट्या पडद्यावर होणार टेलिकास्ट

'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, या दिवशी छोट्या पडद्यावर होणार टेलिकास्ट

मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला खूपच कमी वेळ बोल्ड सीन पाहायला मिळतात. पण मागील वर्षी एका चित्रपटात आतापर्यंतच्या सगळ्याच चित्रपटांना मागे टाकत अतिशय बोल्ड सीन चित्रपटात दाखवले होते. या चित्रपटातील एका गाण्याची तर चांगलीच चर्चा रंगली होती. ‘येडयांची जत्रा’, ‘4 इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘1234’ असे मनोरंजक चित्रपट बनवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी टकाटक हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता. 

टकाटक या चित्रपटाने बॉक्सऑफिस गाजवलं. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करून अनेक पुरस्कार देखील पटकावले. भन्नाट पोस्टर आणि अफलातून ट्रेलर यामुळे या चित्रपटाची सुरुवातीपासूनच चर्चा होती. या चित्रपटातील एका गाण्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'ये चंद्राला' हे रोमँटिक सॉंग पाहायला मिळाले होते. या गाण्यातील प्रणालीचा हॉट अंदाज आणि तिच्या मादक अदा यांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. श्रुती राणे हिने गायलेल्या या गाण्याला युट्युबवर १ करोडच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.


मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आला आहे. मराठीमध्ये अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

पुन्हा एकदा या भन्नाट चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी झी टॉकीजवर २६ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता 'टकाटक' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करणार आहे. त्यामुळे आपला रविवार 'टकाटक' बनवण्यासाठी पाहायला विसरू नका झी टॉकीज.

 

Web Title: This bold song from 'Takatak' Movie broke all records, will be telecast on the small screen this day