अमृता सुलतान खिलजीची दिवानी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:17 IST2018-02-19T10:47:18+5:302018-02-19T16:17:18+5:30
जिने आपल्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांना घायाळ केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचे आज असंख्य फॅन आहेत. ...
.jpeg)
अमृता सुलतान खिलजीची दिवानी!
'राझी' या चित्रपटामध्ये आलिया भट्ट सोबत काम करत आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतीच झाली असून हा चित्रपट तिच्यासाठी एक नाही तर अनेक कारणांमुळे खूप खास आहे.असे अमृताने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले आहे. मात्र की कारण आत्ताच सांगणार नाही त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार असल्याचेही तिने आवर्जुन सांगितले.विशेष म्हणजे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृताची मैत्री अक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटधिवस्तू! ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या. अमृता हे पाहून अगदी भारावून गेली,अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे.