Sonalee kulkarni: केसात माळलेला गजरा, नाकात नथ अन् कपाळी चंद्र कोर, सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 19:22 IST2022-12-02T19:00:21+5:302022-12-02T19:22:24+5:30

केसात माळलेला गजरा, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ सोनालीचा हा लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

Actress Sonalee kulkarni looks stunning in bluee saree | Sonalee kulkarni: केसात माळलेला गजरा, नाकात नथ अन् कपाळी चंद्र कोर, सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक चर्चेत

Sonalee kulkarni: केसात माळलेला गजरा, नाकात नथ अन् कपाळी चंद्र कोर, सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक चर्चेत

सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'नटरंग' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने केलेले लावणीनृत्य प्रचंड गाजले. त्यातील 'अप्सरा आली' या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले.

सोनाली तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोनालीने नुकतेच तिचं निळ्या साडीतलं फोटो शेअर केलं आहेत. केसात माळलेला गजरा, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ अशा सोनालीच्या मराठमोळ्या लूकनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. खूप सुरेख, खूप सुंदर दिसतेस, किती सुंदर दिसते ती आमची सोनू, अप्सरा अशा कमेंट्स चाहत्यांनी तिच्या या फोटोवर केल्या आहेत.  

सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं सोनालीचा व्हिक्टोरिया चित्रपटात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: Actress Sonalee kulkarni looks stunning in bluee saree