राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:51 IST2026-04-24T12:51:08+5:302026-04-24T12:51:51+5:30

जमील जमालीची भूमिका साकारणारे राकेश बेदी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

makers of dhurandhar aditya dhar and lokesh dhar gave 1 crore cheque to rakesh bedi as bonus | राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक?

राकेश बेदींच्या अभिनयावर खूश झाले निर्माते, 'जमील जमाली'ला थेट दिला इतक्या कोटींचा चेक?

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता. याशिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन, अक्षय खन्ना यांचीही भूमिका होती. सिनेमाचे दोन्ही भाग थिएटरमध्ये तुफान गाजले. सिनेमात तगडी स्टारकास्ट असताना अभिनेते राकेश बेदी यांनी लक्ष वेधलं. सोशल मीडियावर जमील जमालीच्याच डायलॉगचे मीम्स व्हायरल होत आहेत. राकेश बेदींच्या अभिनयावर खूश होऊन निर्मात्यांनी त्यांना १ कोटी बोनस दिल्याची चर्चा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राकेश बेदींना 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'साठी ५० लाख रुपये मिळाले. दुसऱ्या भागाच्या रिलीजनंतर  त्यांचा सिनेमातील ट्विस्ट प्रेक्षकांना खूपच आवडला. प्रेक्षक जमील जमालीच्या अभिनयावर खूश झाले. दिग्दर्शक-निर्माता आदित्य धर आणि त्याचा भाऊ-पार्टनर लोकेश धर दोघांनी मिळून राकेश बेदींना १ कोटी रुपयांचा चेक दिला आहे. ही रक्कम त्यांच्या मानधनाच्या दुप्पट आहे. 

यावरुन आदित्य धर किती असाधारण व्यक्ती आहे हे त्याने सिद्ध केलंय. कोणाही कलाकारासाठी इतकं उदार होणं हे खूप कमी वेळा दिसतं. 'धुरंधर'ने जगभरात १३०० कोटींचा बिझनेस केला आहे. तर 'धुरंधर: द रिव्हेंज'ने जगभरात १७०० कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत. राकेश बेदी आगामी 'ये जवानी तो इश्क होना है' सिनेमात दिसणार आहेत. २२ मे रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title : राकेश बेदी के अभिनय से खुश निर्माता, 'जमील जमाली' के लिए मिला करोड़ों का चेक?

Web Summary : राकेश बेदी को 'धुरंधर' में 'जमील जमाली' के किरदार के लिए सराहना मिली और निर्माताओं ने उन्हें 1 करोड़ रुपये का बोनस दिया। फिल्म श्रृंखला ने दुनिया भर में ₹3000 करोड़ से अधिक की कमाई की। वह अगली बार 'ये जवानी तो इश्क होना है' में दिखेंगे।

Web Title : Rakesh Bedi's Performance Delights Producers, Receives Huge Bonus for 'Jamil Jamali'?

Web Summary : Rakesh Bedi, lauded for his 'Dhurandhar' role, reportedly received a ₹1 crore bonus from producers impressed by his portrayal of Jamil Jamali. The film series grossed over ₹3000 crores worldwide. He will next be seen in 'Yeh Jawani Toh Ishq Hona Hai'.