भन्साळींच्या चित्रपटात पत्रलेखा
By Admin | Updated: November 13, 2014 23:19 IST2014-11-13T23:19:44+5:302014-11-13T23:19:44+5:30
हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईटस्’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या पत्रलेखाला आता आणखी एक चित्रपट मिळाला आहे.

भन्साळींच्या चित्रपटात पत्रलेखा
हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईटस्’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या पत्रलेखाला आता आणखी एक चित्रपट मिळाला आहे. एका रोमँटिक चित्रपटासाठी तिला साईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी करीत आहेत. सूत्रंनुसार ‘सिटीलाईटस्’नंतर पत्रलेखा एका चांगल्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होती, आता तिला तिच्या मनासारखा चित्रपट मिळाला आहे. चित्रपटाच्या कलाकारांच्या निवडीमध्ये भन्साळींचाही सहभाग होता. त्यांच्या मते पत्रलेखा या चित्रपटासाठी एक परफेक्ट चेहरा आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अनुराधा तिवारीने लिहिली असून, ती या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. चित्रपटातील नायकाची निवड अद्याप झालेली नाही. या बातमीला पत्रलेखानेही दुजोरा दिला आहे. भन्साळींच्या चित्रपटात काम करणो एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असून ‘सिटीलाईटस्’मधील भूमिकेपेक्षा ही भूमिका वेगळी असल्याचे तिने सांगितले.