'अमेरिका आणि इस्रायलने सीमा ओलांडली...', खामेनेई यांच्या मृत्यूवर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 20:02 IST2026-03-01T19:58:26+5:302026-03-01T20:02:35+5:30

Israel-Iran War: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मध्य-पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Israel-Iran War: 'America and Israel crossed the line', Javed Akhtar's angry reaction to Khamenei's death | 'अमेरिका आणि इस्रायलने सीमा ओलांडली...', खामेनेई यांच्या मृत्यूवर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

'अमेरिका आणि इस्रायलने सीमा ओलांडली...', खामेनेई यांच्या मृत्यूवर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

Israel-Iran War: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य-पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी अमेरिका व इस्रायलच्या कारवाईवर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर निशाणा साधला असून, चीनच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाले जावेद अख्तर?

जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली. ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यावर टीका करत म्हटले की, 'या वेळी अमेरिका आणि इस्रायलने सीमा ओलांडली आहे. त्यांनी इतका दबाव निर्माण केला की, समोरच्यांकडे निर्णायक कारवाईशिवाय पर्याय उरलेला नाही.' त्यांच्या मते, या प्रकारची आक्रमकता दीर्घकालीन अस्थिरता वाढवणारी आहे.

चीनच्या शांततेवर प्रश्न

अख्तर यांनी इस्रायल-अमेरिका हल्ल्यांवर चीनची शांत भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले की, 'जर अशा कारवायांना मूकसंमती दिली आणि इराणशी इराकसारखी वागणूक दिली गेली, तर चीन जागतिक पातळीवर आपली विश्वासार्हता गमावेल,' अशी प्रतिक्रिया जावेद अख्तर यांनी व्यक्त केली.

खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोक

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा सार्वजनिक शोक आणि 7 दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याच हल्ल्यात खामेनेई यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह इराणचे संरक्षण मंत्री अजीज नसीरजादेह आणि सशस्त्र दलांचे प्रमुख यांचाही मृत्यू झाल्याची माहिती इराणी माध्यमांनी दिली आहे.

Web Title : खामेनेई की मौत पर जावेद अख्तर ने अमेरिका, इजराइल को लताड़ा।

Web Summary : अयातुल्ला खामेनेई की मौत के बाद जावेद अख्तर ने अमेरिका और इजराइल की आलोचना की, इसे एक अतिरेक बताया जो क्षेत्र को अस्थिर कर सकता है। उन्होंने चीन की चुप्पी पर सवाल उठाया, चेतावनी दी कि अगर ईरान के साथ इराक जैसा व्यवहार किया गया तो विश्वसनीयता खत्म हो जाएगी। ईरान में शोक।

Web Title : Javed Akhtar slams US, Israel after Khamenei's death in Iran.

Web Summary : Javed Akhtar criticized US and Israel's actions after Ayatollah Khamenei's death, deeming it an overreach that could destabilize the region. He questioned China's silence, warning of credibility loss if Iran is treated like Iraq. Iran mourns Khamenei, declaring public mourning and holidays.