एडेल करणार भव्य पद्धतीने लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 20:33 IST2016-11-22T20:33:17+5:302016-11-22T20:33:17+5:30

बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही सध्या लग्नसराई जोरात आहे. आता ब्रिटिश गायिका एडेल लग्नाच्या बंधनात लवकरच अडकणार आहे. सिमोन कोनेकी याच्यासोबत ती ...

Will Adele marry in a grand manner? | एडेल करणार भव्य पद्धतीने लग्न?

एडेल करणार भव्य पद्धतीने लग्न?

लिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही सध्या लग्नसराई जोरात आहे. आता ब्रिटिश गायिका एडेल लग्नाच्या बंधनात लवकरच अडकणार आहे. सिमोन कोनेकी याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकणार आहे. 

‘हीट’ या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार एडेलने सांगितले की, मला लग्न भव्य पद्धतीने करायचे आहे. त्यासाठी खूप मोठा समारंभ आयोजित करण्याची मी योजना आखत आहे. यासाठी कितीही खर्च आला तरी तो करण्याची माझी तयारी आहे. फक्त अट ऐवढीच आहे की, विवाहसोहळा अविस्मरणीय व्हावा.
 
फिमेल फर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एडेल आणि सिमोन सध्या बेवर्ले हिल्स येथे राहत आहेत. दोघेही लग्नाबाबत सकारात्मक असून, लग्नाची योजना आखत आहेत. सिमोनला पहिल्या पत्नीपासून मुलगी असून, तिलाही लग्नात सहभागी करून घेण्याचा दोघांचाही विचार असून, त्यादृष्टीने ते तयारी करीत आहेत. 

मात्र एडेलच्या लग्नाबाबत असेही बोलले जात आहे की, एडेल सध्या विदेश दौºयावर असून, परतल्यानंतर तिला अतिशय साध्या म्हणजे रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करायचे आहे. त्यानंतर ती एक छोटासा घरगुती समारंभ आयोजित करणार असून, त्यामध्ये मोजक्याच लोकांना ती आमंत्रित करणार आहे.  

हा समारंभ अविस्मरणीय असावा असा तिचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने ती सध्या योजना आखत आहे. एडेलच्या लग्नाबाबत गेल्या दिवसांपासून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत असल्याने तिच्या लग्नावरून सस्पेन्स वाढला आहे. त्यातच एडेल किंवा तिच्या मित्रपरिवाराकडून अद्यापपर्यंत याविषयी कुठल्याही प्रकारचा खुलासा समोर आला नसल्याने एडेलचा विवाह एक चर्चेचा विषय ठरला आहे. 

Web Title: Will Adele marry in a grand manner?