आता लग्न कोणाचं? रिहानाला मुंबईत पाहताच नेटकऱ्यांचा सवाल; पॉप स्टारच्या दुसऱ्या भारत भेटीचं खरं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:42 IST2026-04-24T14:29:55+5:302026-04-24T14:42:14+5:30
रिहाना पुन्हा एकदा मुंबईत; पापाराझींना दिली 'फ्लाइंग किस', 'या' कामासाठी आलीये भारतात

आता लग्न कोणाचं? रिहानाला मुंबईत पाहताच नेटकऱ्यांचा सवाल; पॉप स्टारच्या दुसऱ्या भारत भेटीचं खरं कारण आलं समोर
जागतिक पॉप आयकॉन आणि फॅशन क्वीन रिहाना (Rihanna) पुन्हा एकदा भारतात परतली आहे. दोन वर्षांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात आपल्या परफॉर्मन्सने मंत्रमुग्ध करणारी रिहाना शुक्रवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रिहाना आपल्या खाजगी जेटने मुंबईच्या कलिना विमानतळावर उतरली. यावेळी तिने परिधान केलेल्या ऑल-ब्लॅक आऊटफिटने सर्वांचे लक्ष वेधले. ब्लॅक लोअर्स आणि मॅचिंग हुडीमध्ये रिहाना अत्यंत सुंदर आणि कूल दिसत होती. तिने केसांची सैल वेणी बांधली होती. रिहाना विमानतळाबाहेर येताच पापाराझींनी तिला "रिरी-रिरी!" या नावानं पुकारलं. रिहानाने कॅमेरे पाहताच हसली आणि हात हलवून सर्वांना अभिवादन केले. गाडीत बसण्यापूर्वी तिने फोटोग्राफर्सना एक गोड 'फ्लाइंग किस' दिला आणि ती तिथून निघून गेली.
Global pop icon #Rihanna snapped at the airport as she arrives in Mumbai.#FilmfareLenspic.twitter.com/B3oCRzStZI
— Filmfare (@filmfare) April 23, 2026
यावेळी कोणाचं लग्न आहे?
रिहानाला मुंबईत पाहताच नेटकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आला, "आता कोणाचं लग्न आहे?". एका युझरने विचारले, "रिहाना आली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं कार्य असणार". मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, रिहाना यावेळी कोणत्याही लग्नासाठी नाही, तर तिच्या व्यावसायिक कामासाठी भारतात आली आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, रिहानाचा जगप्रसिद्ध ब्युटी ब्रँड मुंबईत एक मोठा कार्यक्रम आयोजित करत आहे.