​जस्टीन टिम्बरलेक च्या ‘त्या’ कॉमेंटचा मँडी मूरवर आजही आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 15:11 IST2016-11-20T15:11:27+5:302016-11-20T15:11:27+5:30

काही गोष्टी असतात ज्या आपल्या काय स्मरणात राहतात. काही आठवणी मनावर खोलपर्यंत आघात करतात. प्रसिद्ध गायक जस्टीन टिम्बरलेकच्या एका ...

Justin Timberlake's 'That' commentary on Mondi Moore still strikes | ​जस्टीन टिम्बरलेक च्या ‘त्या’ कॉमेंटचा मँडी मूरवर आजही आघात

​जस्टीन टिम्बरलेक च्या ‘त्या’ कॉमेंटचा मँडी मूरवर आजही आघात

ही गोष्टी असतात ज्या आपल्या काय स्मरणात राहतात. काही आठवणी मनावर खोलपर्यंत आघात करतात. प्रसिद्ध गायक जस्टीन टिम्बरलेकच्या एका कॉमेंटने ‘धीस इज अस’ स्टार मँडी मूरवर अशाच प्रकारचा भावनिक आघात केलेला आहे.

ही गोष्ट आहे जेव्हा मँडी केवळ १५ वर्षांची होती. तेव्हा ती जस्टीनचा पूर्वीचा बँड ‘एनवायएसएनसी’च्या शोमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायची. त्यावेळी एकदा त्याच्याशी झालेल्या संभाषणाने तिला आजपर्यंत पछाडलेले आहे. एक टीव्ही शो दरम्यान तिने याविषयी सांगितले.

ती म्हणाली, ‘मला चांगले आठवते की, एकदा बॅकस्टेजला तो माझ्याशी पायांच्या आकाराबद्दल बोलत होता. इतर सर्व डान्सर्स आणि क्रु मेम्बर्सदेखील आसपास होते. त्या सर्वांच्या समोर तो मला म्हणाला होता की, इतर मुलींच्या तुलनेत माझे पाय खूप मोठे आहेत. ही गोष्टी आजही मला खूप टोचते.’


हार्टब्रेकर : जस्टीन टिम्बरलेक

‘खरं तर माझ्या मनात त्याच्याविषयी काहीच राग नाही. त्याला तर ही गोष्ट आठवतसुद्धा नसेल. पण त्या काळी मी त्याची खूप मोठी फॅन होते. त्याच्या प्रभावाखाली होते. त्याने माझ्या पायाबद्दल केलेली ही टिप्पणी मला खूप झोंबली. आजही मी ती विसरू शकलेले नाही.’

Web Title: Justin Timberlake's 'That' commentary on Mondi Moore still strikes