एमिलीच्या व्हिडीओने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 14:17 IST2016-11-20T14:15:41+5:302016-11-20T14:17:31+5:30

एमिली राटाजकोवस्की ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर आंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एमिली नेहमीच बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असते. काही दिवसापूर्वी तिने क्लीवेज शो आॅफ वाला फोटो शेअर केला होता. यावेळी तिने टॉपलेस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Emily's video sensation | एमिलीच्या व्हिडीओने खळबळ

एमिलीच्या व्हिडीओने खळबळ

ट आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जात असलेली अमेरिकन मॉडेल तथा अभिनेत्री एमिली राटाजकोवस्की हिने न्यूड व्हिडीओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. 

आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मूळ ब्रिटीश असलेली अमेरिकन मॉडेल एमिली राटाजकोवस्की ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर आंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एमिली नेहमीच बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असते. काही दिवसापूर्वी तिने क्लीवेज शो आॅफ वाला फोटो शेअर केला होता. यावेळी तिने टॉपलेस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

यात तिने शरीराच्या वरील भागात काहीच परिधान केलेले नाही. ती उत्साहात बीचवर नाचताना दिसते. तशाच अवतारात ती नृत्य करीत असल्याने आणखीनच हॉट आणि बोल्ड दिसतेय. 
बिनधास्त होऊन एमिली समुद्र किनाºयावर भटकतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओसोबतच तिने काही टॉपलेस फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोत ती ज्या हॉटेलमध्ये मजा मस्ती करीत आहे त्याचे नावही दिसून येत आहे. 

एमिलीचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिच्या फॅन्सकडून या व्हिडीओला तुफान लाईक्स व कॉमेण्ट्स मिळत आहे. एमिलीचा हा बिनधास्तपणा नेहमीच चाहत्यांना भावतो. त्यामुळे तिच्या व्हिडीओवर चाहते फिदा झाले आहेत. 

मात्र काही लोकांकडून एमिलीवर या व्हिडीओमुळे टीकाही केली जात आहे. परंतु एमिली याविषयी फारसा विचार करीत नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. मी काहीही केले तरी लोक माझ्यावर टीका करतातच असे तिने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Emily's video sensation