वरुणसोबत काम करायला बेबोचा नकार

By Admin | Updated: July 29, 2014 02:32 IST2014-07-29T02:32:45+5:302014-07-29T02:32:45+5:30

‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरल्यानंतर अभिनेता वरुण धवनची स्टार व्हॅल्यू वाढली आहे.

Denying to work with Varun | वरुणसोबत काम करायला बेबोचा नकार

वरुणसोबत काम करायला बेबोचा नकार

‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरल्यानंतर अभिनेता वरुण धवनची स्टार व्हॅल्यू वाढली आहे. बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या नायिका त्याच्यासोबत काम करण्यासाठी तयार आहेत; पण मिसेस खान म्हणजेच करिना कपूर वरुणसोबत स्क्रीन शेअर करायला तयार नाही. करिनाच्या मते वरुण आणि तिच्या वयात बरेच अंतर आहे. त्यामुळे त्याच्यासोबत रोमान्स करताना कंफर्टेबल वाटणार नाही, असे तिला वाटते. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला वरुणसोबत काम करणार का, असे विचारण्यात आले, तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘वरुण सोबत रोमान्स करण्याऐवजी मला डिनर करायला आवडेल.’ न्यू कमर्ससोबत काम करण्याऐवजी खान त्रिकुटासोबत काम करायला आवडत असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Denying to work with Varun