मध्यरात्री आमिर खानच्या घरी अचानक का गेला सलमान? नेटकरी म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:44 PM2023-01-25T13:44:26+5:302023-01-25T13:51:52+5:30

इतक्या वर्षांनंतर सलमानला अचानक आमिरची आठवण कशी काय झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Why Salman khan visited aamir khan residence at night 7 years | मध्यरात्री आमिर खानच्या घरी अचानक का गेला सलमान? नेटकरी म्हणाले....

मध्यरात्री आमिर खानच्या घरी अचानक का गेला सलमान? नेटकरी म्हणाले....

googlenewsNext

सलमान खान आणि आमिर खान यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कॉलवॉर सुरू आहे. 2016 मध्ये 'दंगल' आणि 'सुलतान' हे चित्रपट रिलीज झाले तेव्हा दोघांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर सलमानने सांगितले की त्याच्यात आणि आमिरमध्ये भांडण झाले नाही. पण त्यानंतर सलमान आणि आमिर ना एकत्र दिसले ना एकमेकांबद्दल बोललेही.  काल रात्री म्हणजेच २४ जानेवारीला जेव्हा सलमान आमिरच्या घरी जाताना दिसला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता की सलमान आमिरच्या घरी का गेला?

आमिर खान आणि सलमान खान एकत्र चित्रपटाची प्लान करत आहेत का? आमिर आणि सलमानमध्ये आता सर्व काही ठीक आहे का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. आता सलमान अचानक आमिर खानच्या घरी का पोहोचला, हे माहीत नाही, पण मुकेश भट्टही आमिर खानच्या घरी पोहोचले. इतक्या वर्षांनंतर सलमानला अचानक आमिरची आठवण कशी काय आली?

अभिनेत्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'द टायगर, भाईजानची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणखी एकाने लिहिले की, सलमान खान म्हणजे संपूर्ण बॉलिवूड. चाहत्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये हार्ट इमोजी टाकला आहे.

आमिर आणि सलमान एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनीही अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, आमीर खानने अभिनयातील ब्रेक संपवून चित्रपटांमध्ये परतावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे तो स्क्रिप्ट लिहित आहे.

Web Title: Why Salman khan visited aamir khan residence at night 7 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.