सायेशासोबत कोणाची वाढलीय जवळीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:59 IST2016-05-15T09:29:34+5:302016-05-15T14:59:34+5:30

 आता ही सायेशा कोण असे तुम्हाला वाटले असेल ना ? वेल, सायेशा सैगल म्हणजे सायरा बानूची नात आहे. आता ...

Who has increased sexual relations with Sisha? | सायेशासोबत कोणाची वाढलीय जवळीक?

सायेशासोबत कोणाची वाढलीय जवळीक?

 
ता ही सायेशा कोण असे तुम्हाला वाटले असेल ना ? वेल, सायेशा सैगल म्हणजे सायरा बानूची नात आहे. आता सलमान खान तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहे. सायेशा आता अजय देवगणच्या आगामी ‘शिवाय’ चित्रपटामधून डेब्यू करणार आहे.

सलमान तिची प्रगती कशी आहे याची सातत्याने चौकशी करताना दिसतोय. आता त्यामुळे अजून एक प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे सलमानच्या आगामी चित्रपटात सायेशा दिसणार का? बरं, आता झाले असे की, दिलीप कुमार आणि सायरा बानुयांच्यासोबत सलमान खानच्या सातत्याने गाठीभेटी होतच असतात.

एकदा त्यांच्याकडे गेला असताना त्याने सायेशाला अ‍ॅक्टिंगमध्ये तिचे नशीब आजमावण्यासाठी विचारले. मग सलमानच्या पुढाकाराने तिला ‘शिवाय’ मध्ये रोल मिळाला. त्यामुळे ती देखील त्याने दिलेले सल्ले मोठया आदराने अवलंबते.

Web Title: Who has increased sexual relations with Sisha?