विराट कोहलीने ज्या जर्मन मॉडेलचे फोटो केले 'लाईक', तिचे 'धुरंधर' फेम कलाकाराशी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:49 IST2026-04-17T13:48:30+5:302026-04-17T13:49:10+5:30
रणवीर सिंह नाही 'या' कलाकाराला फॉलो करते जर्मन मॉडेल

विराट कोहलीने ज्या जर्मन मॉडेलचे फोटो केले 'लाईक', तिचे 'धुरंधर' फेम कलाकाराशी कनेक्शन
क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. आधी अवनीत कौरची फोटो पोस्ट लाईक केल्यावरुन तो चांगलाच ट्रोल झाला होता. 'इन्स्टाग्राम अल्गोरिदमचं कारण त्याने दिलं होतं. तर आता त्याने एका जर्मन मॉडेलचे फोटो लाईक केले आहेत. याचा स्क्रीनशॉट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. लिजलॅज असं तिचं नाव असून ती RCB ची चाहती आहे. लिजलॅज 'धुरंधर'फेम 'या'कलाकाराला फॉलो करते. कोण आहे ती व्यक्ती माहितीये का?
'धुरंधर'ची जादू जगभरात पसरली आहे. सिनेमाने १३०० कोटीं गल्ला जमवला आहे. अजूनही सिनेमा थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान विराट कोहलीने जिचे फोटो लाईक केले ती जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलॅज 'धुरंधर'मधील एका कलाकाराला फॉलो करते. ती म्हणजे सारा अर्जुन. साराने सिनेमा यालिनाची भूमिका साकारली आहे. लिजलॅज सारा अर्जुनशिवाय रश्मिका मंदाना, प्रियंका चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस, कतरिना कैफ, यशराज मुखाटे, करण टॅकर, रणवीर अलाहाबादियालाही फॉलो करते.
विराट कोहलीच्या या सोशल मीडियावरील हालचालींमुळे नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे त्या मॉडेलच्या पोस्टवर युजवेंद्र चहलने 'अल्गोरिदम' अशी कमेंट करत विराटची मजा घेतली आहे. लिझलॅझ ही एक प्रसिद्ध जर्मन-दक्षिण आफ्रिकन सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आणि अभिनेत्री-मॉडेल आहे. लिझलाझ भारतीय संस्कृती, स्थानिक खाद्यपदार्थ आणि शहरांचे दर्शन घडवणारे व्हिडिओ बनवते. तिच्या आदरयुक्त दृष्टिकोनामुळे भारतीय चाहत्यांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय आहे.