विद्या बालन ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 17:20 IST2016-09-10T11:49:32+5:302016-09-10T17:20:32+5:30

मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ९ सप्टेंबरला विद्याच्या उपस्थितीतच तिचे नाव जाहीर केले. तिने हा प्रस्ताव स्वीकारल्याने तिला मुख्यमंत्री यादव ...

Vidya Balan brand ambassador | विद्या बालन ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’

विद्या बालन ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’


/>मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ९ सप्टेंबरला विद्याच्या उपस्थितीतच तिचे नाव जाहीर केले. तिने हा प्रस्ताव स्वीकारल्याने तिला मुख्यमंत्री यादव यांनी धन्यवादही दिले.  समाजवादी पार्टी महिलांना मदत करीत असून, आमच्या सरकारने प्रत्येक क्षेत्रात काम केले आहे. परंतु, प्रचार करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात महिलांना पेन्शनचे चेकही देण्यत आले. याप्रसंगी अभिनेत्री तथा खासदार डिंपल यादव म्हणाली की, समाजवादी पेन्शन योजनेमुळे महिलांना सशक्त होत येणार आहे. लहान मुलांना मतदानाचा अधिकार नाही. परंतु, तरीही सरकरने त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले आहे. याप्रसंगी विद्या म्हणाली की, पैसा हा पॉवर असतो, महिलांना या योजनेचा फायदा होईल. या योजनेसाठी माझे कोणतेच योगदान नाही. परंतु, तरीही मला त्याचा चेहरा बनविल्याने खूप आनंद वाटत आहे.

Web Title: Vidya Balan brand ambassador